Shinde – Fadnavis सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात भाजपच्या ६ तर शिवसेनेच्या ४ जणांना स्थान ?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष झालं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

Shinde – Fadnavis सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात भाजपच्या ६ तर शिवसेनेच्या ४ जणांना स्थान ?

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु झाल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष झालं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तसेच राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या चर्चाना मात्र चांगलंच उधाण हे आलं आहे. अश्यातच दिनांक १९ जून शिवसेनेच्या वर्धापन दिनी किंवा त्याआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष हे लागलं आहे.

शिंदे – फडणवीस राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार हा छोटेखानी असेल अशी माहिती खात्रीलायक सध्या समोर येत आहे. त्यामुळे आत यामध्ये कोणत्या मंत्र्यांना पद मिळणार हे पाहणं देखील महत्वाचे असणार आहे. तर या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या ६ व शिवसेनेच्या ४ जणांना स्थान मिळणार आहेत अशी शक्यता आहे. भाजपचे ४ कॅबिनेट मंत्री तर २ हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे २ कॅबिनेट मंत्री तर २ आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. तसेच जी उरलेली १३ रिक्त मंत्रिपदे आहेत ती ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भरली जाऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जत आहे.

तब्बल ११ महिन्यांपासून शिंदे-फडणवीसांसह मंत्रिमंडळातील त्यांचे १९ सहकारी राज्याचा कारभार चालवत आहेत. दिनांक ४ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील कार्यक्रम आटोपून दिल्लीकडे रवाना झाले. तर दुसरीकदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी नागपूरमधील कार्यक्रम आटोपून दिल्लीला रवाना झाले. रात्री १० वाजता उभय नेत्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा, असं मत मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं समजतं. त्यामुळे आता १९ जून आधी राज्याच्या राजकारणात काय काय घडामोडी होत आहेत हे पाहून नक्कीच महत्वाचं ठरेल.

हे ही वाचा : 

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version