Monday, May 13, 2024

Latest Posts

भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चौघेच दिसतील, बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे सर्व सुरु असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना(ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सुषमा आधारे यांचे पती शिंदे गटात गेल्यावर बावनकुळे यांनी ही टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यावर अशी परिस्थिती येणार आहे की त्यांच्या स्टेजवर केवळ चारच लोक दिसतील असाही दावा त्यांनी केला. ते सांगली मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले बावनकुळे?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणेघेणे नव्हते. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत? आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे.”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात आली असताना त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होण्याच्या ऐवजी काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. कोल्हापूरमध्ये काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी सातारा, ठाणे, मीरा भाईंदर अशा ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राहुल गांधी यांची यात्रा राज्यात असताना काँग्रेस कार्यकर्ते भाजपात का प्रवेश करत आहेत, हा त्या पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे.”

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “राज्यात गुंतवणूक व्हायची असेल तर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री १८ महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. वरिष्ठ सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पहावी लागे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार यांना आणि काँग्रेस पक्षाला सांभाळण्यात जात होता. त्यांनी स्वतःला बंदिस्त केले होते. ते कोणाला बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यांच्या काळात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या, उद्योगांना जागा दिली जात नव्हती, करार होत नव्हते, पर्यावरण परवानग्या दिल्या जात नव्हत्या, उद्योजकांचे शंकानिरसन केले जात नव्हते. यामुळे महाविकास आघाडी सरकारमुळे एकेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडण्यात येत आहे.”

भारतीय जनता पार्टीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ आहे आणि नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान आहे असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “भाजपामध्ये आम्ही सत्तेसाठी नाही तर राष्ट्रासाठी आणि विचारासाठी काम करतो. हीच पक्षातील सर्वांची भूमिका आहे. गटातटाचे राजकारण करणाऱ्यांना भाजपामध्ये स्थान नाही.”

पुढे बोलताना ते म्हणाले की, भास्कर जाधव यांनी फालतू धंदे करू नये. विरोधकांनी कपटकारण करवून सत्ता मिळवली होती. म्हणून अडीच वर्षात सरकार गेले. आता विरोधात म्हणून विरोधाकाची भूमिका बजावा. अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा :

मुंबई विमानतळ कस्टमने एकाच दिवसात केले ६१ किलो सोने जप्त, ७ जणांना अटक

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळवा पुलाच्या मार्गिकेचं उदघाटन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss