Wednesday, February 28, 2024

Latest Posts

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ‘पोलखोल’, म्हणाले…

आज विधान सभेत शेवटच्या दिवशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे.

ASSEMBLY WINTER SESSION 2023 : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशाचा आजचा शेवटचा असून नागपुरात (Nagpur) हे अधिवेशन भरवण्यात आले. आज विधान सभेत शेवटच्या दिवशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला आज धारेवर धरले आहे. महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांविरोधात मोठा दारुगोळा असल्याचा इशारा त्यांनी दिला. तपासामध्ये सगळं बाहेर येईल. विथ प्रुफ सर्व बाहेर येणार असा इशारा त्यांनी दिला. त्यांचा रोख अर्थात उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होता. त्यांनी युवराज म्हणून आदित्य ठाकरे यांना पण चिमटे काढले. यापूर्वी राज्याच्या सत्ताकेंद्रात असलेल्या महाविकास आघाडीच्या काळातील अनेक घोटाळ्यांची मालिकाच त्यांनी बाहेर काढली. एका मागून एक बॉम्ब त्यांनी टाकले. मुख्यमंत्र्यांनी मोठा दारुगोळा सोबत आणला. त्यांचा तोफखाना आज धडाडताना दिसला. त्यांनी महाविकास आघाडीतील अनेक निर्णयांना पट्यावर घेतले. एका पाठोपाठ एक बॉ़म्बगोळे त्यांनी डागले. कोरोना काळातील घाटाळ्यांची मालिकाच त्यांनी समोर आणली. काय केले मुख्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट?

खिचडी घोटाळा पण समोर – कोविड काळात कामगार आणि गोरगरीब वर्गाला मोफत खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात आले होते. ३३ रुपयांत ३०० ग्रॅम खिचडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळ कंत्राटदाराने मापात पाप केले. त्यांनी दुसऱ्या कंपनीला 100 ग्रॅम खिचडीचे कंत्राट दिले. गोरगरिबांचा घास हिरावला. ३०० ग्रॅम खिचडीऐवजी १०० ग्रॅम खिचडीचे वाटप करण्यात आले. या कंत्राटदाराचे किचन गोरेगाव येथील एका हॉटेलचा पत्ता दाखविण्यात आला. हे त्या हॉटेल मालकाला पण माहिती नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टेंडर तिथे सरेंडर – यापूर्वीचे सरकार टेंडर तिथे सरेंडर असे असल्याचा टोला त्यांनी लगावला. कोविड काळात सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर आपल्या स्वकीयांच्या घरी, बाकी जनता फिरते दारोदारी अशी अवस्था होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर केली.

ऑक्सिजन प्लँट – ऑक्सिजन प्लँटची सुरुवात झाली कपड्याचे दुकानतून, रोमिन छेडा नावाच्या व्यावसायिकेचा गंजलेला ऑक्सिजन प्लँट दिल्याने फंगसचा प्रादुर्भाव झाला. त्यात काही लोकांचा जीव गेला. काहींच्या डोळ्यांना त्रास झाला. हे सर्व रेकॉर्डवर असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वीच्या सरकारचा केवळ पैशाशी मतलब होता असे ते म्हणाले.

लाईफलाईनचा काढला पंचनामा – लाईफलाईन हॉस्पिटलमधील घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला. लाईफलाईन नाही तर ही डेथलाईन असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल ने तर लुटा लुटीचा उच्चांक गाठलेला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेत काल्पनिक रुग्णं दाखवले, काल्पनिक डॉक्टर दाखवले. त्यांचा पगार काढला. रुग्णांना औषधं वितरण केल्याचे दाखवले. त्यातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या दौलतीतून कोणाची घरं भरण्यात आली. कोणाच्या तुमड्या भरल्या हे समोर येईल, असा इशारा त्यांनी दिला.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss