Saturday, July 27, 2024

Latest Posts

Manojn Jarange Patil यांनी दिला इशारा, जिभेला आवरा…

सध्या राज्याच्या राजकंट अनेक घडामोडी या घडत आहेत. एकीकडे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे तर दुरीकडे मनोज जरांगे पाटील विरुद्ध सरकार हे वाद सुरु आहेत.

सध्या राज्याच्या राजकंट अनेक घडामोडी या घडत आहेत. एकीकडे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे तर दुरीकडे मनोज जरांगे पाटील विरुद्ध सरकार हे वाद सुरु आहेत. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद सुरू झालेला असताना आता देवेंद्र फडणवीसांनीही यात उडी घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला. तर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी इशारा हा दिला आहे.

समाजात जातीय तेढ निर्माण होत आहे त्यांनी शांत राहावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आरक्षणाचा विषय मार्गी लावू शकतात. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याबरोबरचे लोक आवरावे आणि दिलेला शब्द पाळावा, अन्यथा परिणाम भोगण्यासाठी तयार राहावे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. गोपीचंद पडळकर आणि छगन भुजबळांमुळे फडणवीस अडचणीत आले आहे.

गोपीचंद पडळकर आणि भुजबळांविषयी मनोज जरांगे म्हणाले, गोपीचंद पडळकरांचा विषय म्हणजे ते सामाजिक चळवळीतील नेते आहेत. त्यांनी मराठ्यांबाबत काही वेगळे बोलू नये. आपण सामजिक चळवळीचे अंग असलेले नेते आहेत. एकनाथ शिंदे जे बोलले ते त्यांनी केले आहे. समिती काम करत आहे.नोंदी सापडत असून काम सुरू आहे . काही अधिकारी मुद्दाम विरोधात काम करत आहेत. त्यांना शिंदेंनी वरून कमी करावे . मराठ्यांना विश्वास आहे की शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देतील त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी नाही दिले तर २४ नंतर त्यांच्या विरोधात दंड थोपटण्यास आम्ही तयार आहे. तसेच मनोज जरांगे पुढे म्हणाले आहेत की, जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सजग राहावं असं सातत्याने सांगत आहे मात्र छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर टीका करत आहेत. जातीय तेढ निर्माण करून काही मिळणार नाही. त्यांना ही माझी ही शेवटची विनंती आहे, जिभेला आवरा, गोरगरीब लोकांचे चांगले संबंध आहेत ते खराब करू नका. राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करू नका.

तर पुढे बोलत असताना जरांगे यांनी मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील हल्लबोल हा केला आहे. मंगलप्रभात लोढा कोण आहेत?. मराठ्यांवर बोलण्याची यांना काय गरज पडली . हे फडणवीसांच्या जवळचे आहेत. फडणवीस यांना लक्षात आले पाहिजे. राज्यात शांतता राहिली पाहिजे, आपण सरकार चालवतो. राज्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यांच्या लोकांनी असे स्टेटमेंट केलं नाही पाहिजे. फडणवीसांनी जे शब्द दिले त्याचा आम्ही सन्मान केला. आरक्षण देतो, गुन्हे मागे घेतो, अटक करणार नाही म्हणाले,अटक केली, गुन्हे दाखल केले नेमकं तुमच्या मनात डाव काय आहे हे एकदा स्पष्ट करा. तुमचे हे लोक थांबवा, थांबवायचे नसतील तर आम्ही ओळखून घेतले आहे फडणवीस साहेब काय करायचे आहे. ही धमकी नाही . असं देखील जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss