Tuesday, April 16, 2024

Latest Posts

मराठा जनेतेने कायद्याचे वाचन करावे, हे आरक्षण टिकणारं नाही – गुणरत्न सदावर्ते

मागील कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता.

मागील कित्येक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता. पण अखेर आज मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या कुटुंबाला प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. या सर्व मागण्यांवरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चाना उधाण आले आहे. अनेक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचं दार ठोठावू, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तसेच ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचे काम केले, मराठा जनेतेने कायद्याचे वाचन करावे, हे आरक्षण टिकणारं नाही, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की, खुल्या वर्गातील ब्राम्हण, वैश्य, जैन, मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबुत ठेवणे, त्यावर गदा येऊ न देणे, त्यासोबतच खऱ्या मागासवर्गीय जाती आहेत, त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणे, याची जबाबदारी आमच्यावर आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. मागास वर्गातील कष्टकरी आहेत, त्यांनाही न्याय मिळायला हवा. मात्र, आज दिलीय ती नोटीस आहे. आम्ही लवकरच न्यायालयात जाणार, संजय राऊतांनी माझ्या मराठा भावांना भरीस घातले, मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावे आणि कलमं बघावीत, असे गुणरत्ने सदावर्ते म्हणाले.

सगेसोयरे यांबाबत जे बोलले गेले, ते आधीपासून कायद्यात अंतर्भूत आहेत. कुणीही या गोष्टीला विजयोत्सव वगौरे म्हणू नये, जरांगेंकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब. वेगवेगळे स्टंट केले जातात, त्यांपैकी हा एक पॉलिटीकल स्टंट. कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही, डंके की चोट पर कोणतीही बॅक डोअर एन्ट्री हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही, अशी तरतुद कायद्यात नाही. कुणबींना मागास कुणबी नाही, हे स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे. आजच्या प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात, मात्र कायद्यानुसार आरक्षण टिकू शकत नाही, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

हे ही वाचा:

आपण आजवर ५० टक्क्यांच्या समुद्रात पोहत आहोत – मंत्री छगन भुजबळ

१६ फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षणावर हरकत घेण्याची मुदत, छगन भुजबळांची विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss