Saturday, July 27, 2024

Latest Posts

मिमिक्री ही एक कला…, कल्याण बॅनर्जी यांचे राज्यसभेचे सभापती धनखर प्रकरणावर स्पष्टीकरण

उपाध्यक्ष जगदीप धनखर यांची नक्कल करून वादात सापडलेल्या तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी स्पष्टीकरण दिले आहे.

उपाध्यक्ष जगदीप धनखर यांची नक्कल करून वादात सापडलेल्या तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवार दिनांक २० डिसेंबर रोजी स्पष्टीकरण दिले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझा कधीच कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. धनखरसाहेब माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. त्यांनी ते स्वतःवर का घेतले हे मला माहीत नाही.”

या प्रकरणात मिमिक्री ही आपली कला असल्याचे सांगत कल्याण बॅनर्जी म्हणाले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वी संसदेत असेच केले आहे. जगदीप धनखर यांचा खूप आदर करतो, असेही त्यांनी सांगितले. जगदीप धनकर यांच्या मिमिक्रीद्वारे केलेल्या उपहासाचा बचाव करताना बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही ओढले. ते म्हणाले, “मिमिक्री ही एक कला आहे. त्याचा कोणाचाही अपमान करण्याशी संबंध जोडता कामा नये. पीएम मोदींनी लोकसभेतही मिमिक्री केली. मी त्याचा व्हिडिओही दाखवू शकतो.” बॅनर्जी म्हणाले, “पीएम मोदींनी २०१४ आणि २०१९ मध्ये हे केले होते. माझे प्रकरण इतके गांभीर्याने का घेतले गेले?”

कल्याण बॅनर्जी यांनी संसद भवनात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, अध्यक्ष धनखर आणि ते दोघेही वकिली व्यवसायाशी संबंधित आहेत. ते म्हणाले, “धनखार साहेब हे कायदेशीर व्यवसायात माझे वरिष्ठ आहेत. मी धनखर यांचा खूप आदर करतो. कोणाला दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. ते ते स्वतःवर का घेत आहेत हे मला कळत नाही.” यानंतर ते पुन्हा एकदा उपरोधिकपणे म्हणाले की, माझा प्रश्न आहे की, जर त्यांनी ते स्वत:वर घेतले असेल तर ते राज्यसभेत असे वागतात का?

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या मिमिक्रीमुळे सर्व बाजूंनी अडचणीत आलेले TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक गौतम नावाच्या वकिलाने डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अभिषेकने आपल्या तक्रारीत उपराष्ट्रपतींचा अपमान केल्याचा दावा केला असून तृणमूल खासदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर बॅनर्जींच्या या कृतीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) टीका केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाच्या उपराष्ट्रपतीं विरोधातील या कारवाईचा निषेध केला आहे.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss