Monday, May 20, 2024

Latest Posts

संजय राऊतांच्या टीकेला मोदींचे प्रतिउत्तर, नरेंद्र मोदी म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्यातरी सुद्धा सत्ताधारी आणि राजकीय पक्षांमध्ये अनेक वाद सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्यातरी सुद्धा सत्ताधारी आणि राजकीय पक्षांमध्ये अनेक वाद सुरु आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन दिवसांआधी भाजपवर टीका केली होती. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. संजय राऊत वारंवार मोदी, शाहांवर टीका करत असतात. त्यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींनी प्रतिउत्तर दिले आहे. मोदींनी दिलेल्या प्रतिउत्तरामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज विरोधकांनी १०४ वेळा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांना शिवीगाळ केली आहे. औरंगजेब या नावानं माझा सन्मान केला. असं म्हणत मोदींनी संजय राऊत यांनी केलेल्या विधानाला प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले होते, औरंगजेबचा जन्म पीएम मोदींच्या गावाजवळ झाला होता. त्यामुळे दोघांची विचारसरणी सारखीच आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे भाजप नेते आक्रमक झाले होते. त्यावर आता नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे. सरकार आपल्या कामाचे दहा वर्षांचे रेकॉर्ड ठेवते. आम्ही पुढील २५ वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत आणि आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांचा आराखडाही तयार करत आहोत. दुसरीकडे आमचे विरोधक आहेत. ते नवनवीन विक्रमही करत आहे. आज त्यांनीच दहावी शिवी मोदींना दिली. औरंगजेब म्हणून मला सन्मानित केलं, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर टीका करताना भाजप नेते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, औरंगजेबाचा गौरव करणाऱ्यांच्या पाठीशी उद्धव यांची शिवसेना उभी आहे. अशा सर्व वक्तव्यांना जनता योग्य प्रतिसाद देईल, असे सुधांशू त्रिवेदी म्हणाले. संजय राऊत यांच्याकडून वारंवार मोदी आणि भाजपवर टीका केली जात आहे. त्यानंतर अखेर आज मोदींनी त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.

हे ही वाचा:

चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर होणार का? उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

मासिकपाळी का उशिरा येते; जाणून घ्या करणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss