Friday, May 3, 2024

Latest Posts

मुंबई – गोवा महामार्गावर परशूराम घाटात दरड कोसळी वाहतुकीसाठी घाट बंद

त्यामुळे घाटात संपुर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या स्थळाला भेट देऊन तेथील पाहणी केली.

चिपळूण: कोकणात अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढल आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे घाटात संपुर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या स्थळाला भेट देऊन तेथील पाहणी केली.
वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. बहादूर शेख नका येथे देखील खासगी प्रवासी बस थांबवण्यात आल्या आहेत. सतत च्या पावसामुळे घाट बंद करण्यात आला आहे. कुठली ही जीवित हानी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात हा घाट पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. घाटात धोकादायक पद्धतीने डोंगर कटाई करण्यात आली असल्याने वारंवार दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात धो धो बरसणाऱ्या पावसामुळे हे प्रमाण आणखीनच वाढले आहे.

Latest Posts

Don't Miss