Monday, May 20, 2024

Latest Posts

नरेश म्हस्के यांनी केला सलग दुसऱ्यांदा गौप्यस्फोट

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिंदे फडणवीस सरकार जेव्हा पासून सत्तेत उतरले आहेत तेव्हा पासूनच ठाण्याचे नरेश म्हस्के हे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. नरेश म्हस्के यांनी ठाण्यातून एकावर एक गौप्यस्फोट करायला सुरवात केली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकारणात लगेचच चर्चेला उधाण येते.

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिंदे फडणवीस सरकार जेव्हा पासून सत्तेत उतरले आहेत तेव्हा पासूनच ठाण्याचे नरेश म्हस्के हे बऱ्याचदा चर्चेत येत असतात. नरेश म्हस्के यांनी ठाण्यातून एकावर एक गौप्यस्फोट करायला सुरवात केली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकारणात लगेचच चर्चेला उधाण येते. राजकीय चर्चा रंगल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष आपापली बाजू कशी सावरता येईल आणि एकमेकांवर कसे हवे दवे करता येईल याचा विचार करत असतात अशातच नुकतेच नरेश म्हस्के यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह घेणार की काय अशी चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थित शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे (Thane) माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी सलग दुसऱ्या दिवशी गौप्यस्फोट केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघडे पाडण्याचे प्रयत्न केले जात आहे. यामध्ये शंकाच नाही. अजित पवारांवर आरोप केल्यानंतर ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नरेश म्हस्के यांनी आरोप केले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर नरेश म्हस्के बोलत असताना त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीचा मुद्दा समोर ठेवून त्यांनी यावेळेस त्यावेळी अजित पवारांविरोधात आंदोलन करा, त्यांचे पुतळे जाळा, असे फोन जितेंद्र आव्हाड यांनी कुणा कुणाला केले होते, हे एकदा तपासून घ्या..असे वक्तव्य केले. त्यामुळे आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे पहायचे वाकून हा प्रकार यांच्या राजकारणात केले जात आहे अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
तसेच नरेश म्हस्के यांचे ठाम मत आहे की , अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या मध्ये राजकीय मतभेद निर्माण होत आहे. आणि अजितदादांचा खरा चेहरा आता लोक ओळखू लागलेत. जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात तेव्हा लगेचच मुंबईत अजितदादांचे बॅनर्स लागतात. याचाच अर्थ अंतर्गत पक्षा-पक्षामध्ये मतभेद आहेत, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केलाय. सकाळचा शपथ विधी केला जातो, रोहित पवार विरोधात काय ते काय करतात, उद्धव ठाकरे यांना अजित दादा का डोळे मारतात? अजित दादा जे काही करतात हे आता जनतेला कळाले आहे, असं वक्तव्य नरेश म्हस्के यांनी केलंय. तेव्हा आव्हाडांनी कुणा-कुणाला फोन केले?त्यामुळे आता राजकारणात नरेश म्हस्के विरुद्ध अजित पवार अशी नवीन जोडी तयार होत आहे. आणि त्यांच्यात आता हमरी – तुमरी होणार हे निश्चित आहे. त्याचबरोबर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित दादा आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात देखील देणगी लावण्याचा प्रयत्ने केला हे दिसून येते. कारण नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार अजित दादांनी पहाटेची शपथ घेतली. त्यानंतर याच ठाण्यात आव्हाडांनी दादांचे पुतळे जाळायचे, फोटोला काळे फासायचे, असे फोन कोणा कोणाला केले, असा गौप्यस्फोट नरेश म्हस्के यांनी केलाय.

त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कुणा-कुणाला फोन केले हे अजित दादांनी तपासून घ्यावे. असा सल्ला देखील माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांना दिला आहे. स्वतःचे ठेवायचे झाकून दुसऱ्यांचे पहायचे वाकून अशी अजित दादांची गत झाल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी प्रसार माध्यमांसमोर
दिला. भाजपा युती म्हणून निवडून आलो आणि मविआत शामिल झाले मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसले हे कळेल. आव्हाड यांनी जुने ट्विट काढून पहावे. अशी टिप्पणी नरेश म्हस्के यांनी केली. त्याचबरोबर आपल्या पहिल्या गौप्यस्फोटाविषयीची देशील आठवण करून दिली. नरेश म्हस्के यांनी ठाण्यात बोलताना यापूर्वीही एक दावा केलाय. रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले होते, असा आरोप त्यांनी केलाय. राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह या निमित्ताने नव्याने चर्चेत आले आहेत.

हे ही वाचा : 

संजय राऊतांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; मोबाईलवर आला मेसेज!

प्रेमाच्या ‘सरी’ची ‘संमोहिनी’, रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

IPL 2023 : आज रंगणार दोन सामने! ‘हे’ संघ येणार आमने-सामने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss