Monday, May 20, 2024

Latest Posts

माझ्या गाडीत आणि कार्यक्रमात महिलांना प्राधान्य- राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचा कोणताही कार्यक्रम असो किंवा दौरे हे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही, अशी तक्रार राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. यावर उत्तर देत, यापुढे महिला अध्यक्ष माझ्यासोबत गाडीत बसतील आणि माझ्या कार्यक्रमात जास्त करून महिलांचा सहभाग असेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी मेळाव्याच्या आधी राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर आपला राग व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचा कोणताही कार्यक्रम असो किंवा दौरे हे ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतले जात नाही, अशी तक्रार राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. यावर उत्तर देत, यापुढे महिला अध्यक्ष माझ्यासोबत गाडीत बसतील आणि माझ्या कार्यक्रमात जास्त करून महिलांचा सहभाग असेल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

निवडणुकांमुळे पुढील १२ महिने सर्वांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले की, काहीतरी होणार अशी चर्चा असायची. आताचे मुख्यमंत्री दिल्लीला पालकमंत्री ठरवायला जातात, पण नांदेडला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले आहे.

 

सुप्रिया सुळे यांनी असेही म्हटले आहे की, माझा मेट्रोला विरोध नाही पण पुण्यात मी आधी पीएमटी आणि एसटी महामंडळ चांगलं केल असतं. मी पैसा तिथं घालवला असता. मेट्रोत फॅशन शो वाढदिवस साजरे केले जातात, पत्ते खेळले जातात. सध्याच्या सरकारच्या काळात शाळा बंद झाल्यात आणि दारूची दुकानं वाढली आहेत.

हे ही वाचा: 

जत तालुक्यातील ६५ गावांना सिंचनाचा लाभ मिळणार

सुप्रीम कोर्ट करणार नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss