Monday, January 29, 2024

Latest Posts

नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप, मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या …

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. अश्यातच आता सभागृहात भाजप नेते नितेश राणे यांनी एक गंभीर आरोप केला आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. अश्यातच आता सभागृहात भाजप नेते नितेश राणे यांनी एक गंभीर आरोप केला आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला आहे.

नितेश राणे म्हणाले, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी ९३ च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगतोय. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो आणि व्हिडीओ आहेत.१९९३ चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील यारोपी सलिम कुत्ता हा पेरोलवर असताना तो पार्टी करतो. ⁠उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, ⁠हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठींबा आहे.

सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली. यावर एसआयटी चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला आहे. मविआचं सरकार आल्यानं पेग, पेंग्विन आणि पार्टीला सुरुवात झाली, असे आशिष शेलार म्हणाले.

नितेश राणेंनी केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सलीम कुत्ता बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी आहे⁠. दाऊदच्या जवळचा सहकारी आहे . ⁠पेरोलवरती असताना पार्टी करायची . कुत्ता याच्यासोबत कुणाचा संबंध आहे. ⁠त्यात आणखी कोणाचा संबंध आहे का याची चौकशी केली जाणार आहे. एसआयटीच्या माध्यमातून वेळेत चौकशी केली जाणार आहे.

हे ही वाचा:

Nana Patole यांचा थेट हल्लाबोल, भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय…

संसदेत झालेल्या गोंधळावर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss