Friday, May 3, 2024

Latest Posts

विश्वासदर्शक ठरवावेळी अनुपस्थित असलेल्या ९ आमदारांना काँग्रेसकडून नोटीस

गैरहजर असलेल्यांपैकी यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. 

मुंबई: शिंदे – फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरवावेळी मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ११ आमदार उपस्थित नव्हते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली आहे. गैरहजर असलेल्यांपैकी यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे. (Notice to 9 upsent Congress MLA’s on voting day)
विश्वासदर्शक ठरावासाठी सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली. मात्र, काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख हे आमदार उशिरा पोहोचले. त्यामुळे त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याबद्दल चर्चा करण्यात आली. तेव्हा ती नऊ नावं समोर आली. काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते. दोन जण आधीच कल्पना देऊन गैरहजर होते.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे, असे विधान केल्यामुळे काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली होती. आता प्रकरणात पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आला आहे.

Latest Posts

Don't Miss