Tuesday, May 21, 2024

Latest Posts

माझ्या बोटाला धरून राजकारणात आलात आणि आता मलाच… Sharad Pawar यांचे PM Modi यांना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल पुणे येथे महायुतीच्या (Mahayuti) सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. त्यानंतर महाराष्ट्रातील, राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आता शरद पवार यांनी यावर प्रत्त्युत्तर दिले असून “माझ्या बोटाला धरून राजकारणात आलात आणि आता मलाच ‘भटकतीआत्मा’ म्हणता,” अश्या शब्दांत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ करण्यात आलेल्या सभेत आज (मंगळवार, ३० एप्रिल) शरद पवार यांनी भाषण केले. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर खूप राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होत. मी शरद पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आलेलो. मात्र, आता ते बोलत आहेत कि महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे. ती अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ आत्मा गेली ४५ वर्षे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करत आहे. तो सरकार अडचणीत आणतो, असे मोदी म्हणतात. माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही तर लोकांच्या दुःखासाठी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांची दुःख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल त्यामध्ये काही गैर नाही. सध्या देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड आहे. त्यासाठी मी १०० वेळा अस्वस्थ होईल.”

पुढे ते म्हणाले, “सामान्य माणसांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्याच्या समस्याच सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. हे यशवंतराव चाव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही.”

पुढे पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “मोदी म्हणतात कि तडफड करतो. होय, मी लोकांचं दुःख पाहून तडफडतो. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र लाचार होणार नाही. भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडला. अनेक वर्ष काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडले. हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जनतेला अडचणी दूर करण्यासाठी सततचा वापर करायचा असतो. इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पंतप्रधान काळ म्हणाले, मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आत तुम्ही एक टक्का म्हणा कि आणखी काय म्हणा, पण तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जात आहेत.”

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

Exclusive: Thane लोकसभेतून Naresh Mhaske यांची उमेदवारी निश्चित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss