Wednesday, May 15, 2024

Latest Posts

आता लक्ष अस्लम शेख यांच्या स्टुडिओकडे वळणार, किरीट सोमय्या

सध्या महाराष्ट्र्राचा राजकारण चांगलंच तापल्याच दिसून येत आहे. आणि यात आज ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय (Unauthorized office) तोडल्याचा दावा केला होता. त्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली तर आता किरीट सोमय्या यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लबोल केला. लोकायुक्तांच्या सुनावणीत झालेल्या निर्णयाचं पालन होत आहे. या कार्यलायाला वीज कनेक्शन कुठून आलं होतं याची चौकशी करा अशी मागणी सुद्धा किरीट सोमय्या यांनी केली आहे. आता लक्ष अस्लम शेख यांच्या स्टुडिओकडे वळणार असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या संधार्बत ज्या वेळी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं कि “हा विषय आजचा नाही. जेव्हा घरं वाढवण्यात आली, तेव्हा हे नियमितीकरण करण्यासाठी २० वर्षांपूर्वी अर्ज केला होता. पण ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. पण अनिल परबांचं ऑफिस तोडलं तर दहशत निर्माण करता येईल अशा विचारातून हे करण्यात आलंय. भाजपाने हा किरीट सोमय्यांच्या माध्यमातून साधलेला डाव आहे का? भाजपाचा या सगळ्याला पाठिंबा आहे का? हा माझा प्रश्न आहे. किरीट सोमय्यांना माझं आव्हान आहे की नारायण राणेंचं घर तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या तिथे येणार आहेत का माझ्यासोबत बघायला? मी तर म्हाडाच्या लोकांना घेऊन जाणारच आहे तिथे. ते घर कसं तोडलंय ते बघायचंय”, अशा शब्दातं अनिल परब यांनी यावेळी किरीट सोमय्यांना आव्हान दिलं आहे.

हे ही वाचा:

अनिल परबांचा किरीट सोमय्यांवर खोचक टोला, सोमय्या म्हाडाचा मुकादम आहे का?

Budget 2023 , ‘भारत प्रथम, नागरिक प्रथम’ हा विचार घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढे नेणार, नरेंद्र मोदी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss