Tuesday, May 21, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मात्रोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 62 व्या वाढदिवस आहे. या निमित्ताने ठाकरे यांचे निवासस्थान मात्रोश्रीवर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. राज्यभारातून उद्धव ठाकरेंवर वाढदिवसाच्या शुभेच्यांचा वर्षाव होत आहे. पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. शिवसेनेवरील सत्तासंघर्षचे संकट दूर व्हावं, तसंच उद्धव साहेबांना निरोगी व दिर्घायुष्य लाभावे, यासाठी गणपती बाप्पाला साकडे घालण्यात आले. मातोश्रीवरही रात्री बारा वाजता केक कापून उद्धव ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंना प्रतिज्ञापत्र भेट दिली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यात.

उद्धव ठाकरेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांना आवाहन केले. भेटी, पुष्पगुच्छ न देता पक्षाच्या निष्ठेचे शपथपत्र द्यावे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. कुणी उद्धव ठाकरेंसाठी जालन्याहून पायी आले आहे. तर कुणी रक्ताने त्यांचे स्केच बनवून आपली निष्ठा आणि सोबत असल्याची ग्वाही देत शुभेच्छा देण्यासाठी आले आहे. मात्रोश्री बाहेर शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी  रांगच रांगा उभ्या लावल्या आहेत.

हेही वाचा : 

भाजप देवेंद्र फडणवीसांशी अस का वागले?,फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले…

Latest Posts

Don't Miss