Thursday, May 2, 2024

Latest Posts

भाजप देवेंद्र फडणवीसांशी अस का वागले?,फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले…

Uddhav Thakeray And Sanjay Raut Interview : सध्या राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे व संजय राउत यांच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा सर्वत्र होत आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनसह भाजपवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदा बाबत उद्धव ठाकरे यांनी प्रश्न निर्माण केला. ते म्हाणाले, ” भाजप त्यांच्या बरोबर असे का वागले हे मला कळाल नाही. पण असो त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे तो. या पक्षातील जुने जाणते अजूनही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला असा गैरसमज करू नाही द्यायचा की, त्यांना शिवसेनेसोबत यायचे आहे. मी उगाच असा पोकळ दावा करणारही नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करताहेत. बाहेरच्या माणसांना सर्व दिले जातेय. त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसे बसवली. ‘असो उपरवाले की मेहरबानी’, असे म्हणत ठाकरे यांनी टोला लगावला.

राज्यातील परिस्थिती हास्यजत्रेचा दुसरा सिझन वाटत नाही का? असे राउतांनी विचारे असता ठाकरे म्हणाले…

“राज्यातल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सत्ता स्थापनेची घोषणा झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चितच असताना अचानक फडणवीसांनी शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केली. तसेच आपण बाहेरुन पाठिंबा देत असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. काही वेळातच शपथविधी होणार अशी घोषणाही झाली. मात्र अचानक मोदींच्या निर्णयामुळे आणि भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री होण्याचे आदेश दिला आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या”, असे ठाकरे यांनी म्हटले.

शिवसैनिकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न

उद्धव ठाकरे म्हणाले, “पूर्वी अनेकांनी म्हटले होते की शिवसेना या निवडणुकीनंतर राहणार नाही. मुंबईत आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र आलेत. त्यावेळी त्यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला की, हे मराठी ते अमराठी वगैरे, पण आता ही सगळी मंडळी मला येऊन भेटताहेत. मराठी, अमराठी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न आजसुद्धा सुरू आहे. पण आता याला कोणी बळी पडणार नाही. मराठी माणसे एकवटली आहेत. तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय, आणि माझे मत असे आहे की, मुंबईच्याच नव्हे, तर राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकाही व्हायला हव्यात, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केले.

हेही वाचा : 

‘मुख्यमंत्री पदानंतर उद्या हे स्वत:ला नरेंद्र मोदी समजून पंतप्रधानपदावर दावा सांगतील’ : उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला

Latest Posts

Don't Miss