Wednesday, February 28, 2024

Latest Posts

POLITICS: निवडणूक फक्त भाजपासाठी नव्हे, तर भारतासाठी, काय म्हणाले DEVENDRA FADNAVIS?

येणाऱ्या निवडणुकांचे आव्हान आपल्या हाती आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनी केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? हे सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इंडिया आघाडीने आपल्या परिवारवादी पक्षांना सत्तेत आणण्यासाठी मोदींचा विरोध सुरु केल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील भाजपाच्या बैठकीत केली आहे.

ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आम्ही संकट येऊ देणार नाही, आम्ही ओबीसी समाजाकडे व्होट बँक म्हणून पाहत नाही, ही निवडणूक फक्त भाजपासाठी नव्हे, तर भारतासाठी लढायची आहे असेही यावेळी फडणवीस म्हणाले.आपल्यासमोर लोकसभा निवडणूकीचं आव्हान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मोदी देशाला विकसीत करू शकतात असा जनतेला विश्वास आहे असं फडणवीस म्हणाले. देशाचं नेतृत्त्व पुन्हा एकदा मोदींकडे देण्याचं जनतेचं मत आहे असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss