Friday, April 19, 2024

Latest Posts

५०० वर्ष देश मागे घेऊन जाण्याची तयारी – खासदार संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी सवांद साधला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी सवांद साधला. तेव्हा संजय राऊत म्हणाले, धार्मिक मिरवणुकीतून ते संसेदमध्ये येतात. ५०० वर्ष देश मागे घेऊन जाण्याची तयारी सुरु ठेवा. मोदी शहा अश्मयुगात घेऊन जात आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

नाशिकमध्ये संजय राऊत म्हणाले, नाशिकमध्येच का धाड सत्र झाले. त्यांचे संबंध कोणाकडे, त्यांची गुंतवणूक कोणाकडे आहे. नाशिकमध्ये ललित पाटील, पांढरपेशे पाटील आहेत. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे स्पष्ट होईलच. अनेक कोट्यवधी रुपयांचे व्यवहार समोर आले आहेत. प्रमुख शहरातील ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो आहे. आमदार अधिकारी कोण आहेत ? काही अधिकारी मिंधे नसतात. त्यांच्याकडून निवडणुकीसाठी पैसे घेण्यात आले आहेत. त्यांना ब्लॅकमेल केला जात आहे. राजकारण असेच आहे. जालन्यामध्ये माल मसाला घेऊन गेले. कोण घेऊन गेले तर समोर आले आहे. सगळीकडे जे चालू आहे ते भयंकर आहे, असे संजय राऊत म्हणाले.

झारखंडचे सीएम हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, ७ हजार पोलिसांचा फौजफाटा आला होता. तिथे जास्त जागा आहेत तिथेही त्यांना जागा घ्यायच्या आहेत. सोरोन हे अडथळा ठरतील म्हणून त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये घोटाळा झाल्यानंतर त्याला किल्न चिट दिली जाते. हसन मुश्रीम, भावना गवळी, प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप केले होते. आसामचे मुख्यमंत्री आता कुठे आहेत. रोहित पवार आणि अजित पवार यांच्या कारखान्यांचा विषय सारखाच आहे. पण सध्या ईडीच्या दारात रोहित पवार चक्करा मारत आहेत. कारण तिकडे मिंधे जात नाहीत. जनता दलाचे खजिनदार त्यांच्यावर धाडी पडल्या म्हणून नितीश कुमार गेले. अरविंद केजरीवाल हे जायला तयार नाही. आमच्या प्रमुख लोकांमुळे लोकशाहीचे रक्षण केले जाईल, असे संजय राऊत म्हणाले.

आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यांवर संजय राऊत म्हणाले, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. तो दोन रुपयांनी कमी केला जाईल, त्यात तुम्हला काहीच मिळणार नाही. नवीन राज्य घटना लिहिलण्याच्या तयारीवर संजय राऊत म्हणेल, धार्मिक मिरवणुकीतून ते संसदेत येतील. ५०० वर्षे देश मागे घेऊन जाण्याची तयारी सुरु झाली. मोदी-शाह अश्मयुगात घेऊन जात आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

हे ही वाचा:

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर गॅन्ट्री उभारणीच्या कामासाठी आज दोन तासांचा ब्लॉक, या वेळेत महामार्ग असणार बंद

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन सुरू, २०४७ पर्यंत भारत विकसित देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss