spot_img
Monday, February 19, 2024
spot_img

Latest Posts

अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर पृथ्वीराज चव्हाणांनि दिली प्रतिक्रिया

येणाऱ्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या जागा वाटपारून महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चुरशीच्या चर्चा सुरु झाल्याचं दिसत आहे.

येणाऱ्या आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या जागा वाटपारून महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चुरशीच्या चर्चा सुरु झाल्याचं दिसत आहे. अशातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या एका विधानावरून महाविकास आघाडीत तीव्र पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हाच मोठा भाऊ आहे, असं विधान अजित पवारांनी केलं होतं.त्यावरून महाविकास आघाडीमध्ये थोड्या फार प्रमाणात जागा वाटपावरून तू तू मे मे होणार की काय असा पेच निर्माण झाला आहे.

यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा अधिक असायच्या. तेव्हा जागावाटपात आम्हाला लहान भाऊ म्हणून कमी जागा मिळायच्या. आता आम्ही काँग्रेसचे मोठे भाऊ झालो आहोत. काँग्रेसचे ४४, तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत,” असं अजित पवार यांनी म्हटलं. विधान करण्यात चुकीचं नाही” यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संबंधी प्रसारमाध्यमांशी बोलत विधान केलं. आजच्या स्थितीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबर, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तीन नंबरला आहे. त्यामुळे काही विधान करण्यात चुकीचं नाही. पण, अशा वक्तव्यांना फारसं महत्वं नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करण्यात येतात,” असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

तसेच छोटा भाऊ आणि मोठा भाऊ मुद्द्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या प्रमाणे त्यांच्याया वक्तव्याला उत्तर दिले अगदी त्याच प्रमाणे अजित पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाष्य केले आहे. आम्ही मोठे होतो, तेव्हा कधीच गर्व केला नाही. त्यांनीही गर्व करू नये. आम्ही मोठेपणाची घमेंड केली नाही. असे नाना पाटोळे म्हणाले.

हे ही वाचा:

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Ed कार्यालयात जाण्यापूर्वी जयंत पाटलांची प्रतिक्रिया, काही गोष्टी सोसाव्या….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss