Saturday, July 27, 2024

Latest Posts

राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मोठी घोषणा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार विशेष अनुदान

दुध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दुध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात

दुध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दुध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवाय, दुधाच्या पुष्ट (Flush) काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, असे असुनही राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून, दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरीक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरीक्त दूध स्विकारून त्याचे दुध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरीक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्वोच्च स्थानी ठेवुन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

  • सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधाकरीता दुध उत्पादकास प्रतिलिटर रु.5/- अनुदान देण्यात येईल.
  • सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबविण्यात येईल.
  • याकरिता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी यांना 3.2 फॅट व 8.3 SNF करिता प्रति लिटर किमान रु.29/- दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित ( ऑनलाईन पध्दतीने ) अदा करणे बंधनकारक राहील. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रु.5 प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील.

  • (DBT) डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी (Ear Tagging) लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील.
  • ही योजना दि.01 जानेवारी 2024 ते दि.29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागु राहील. तद्नंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवुन मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
  • सदर योजना आयुक्त ( दुग्धव्यवसाय विकास ) यांच्या मार्फत राबविली जाईल.
  • याबाबतीतील शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल.

हे ही वाचा:

 “संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss