Saturday, May 18, 2024

Latest Posts

रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचं सरकारला आवाहन

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज कोकण दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला (Refinery) विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज कोकण दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला (Refinery) विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधामध्ये घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. संवाद साधताना ते म्हणाले की, हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी घोषणा केली आहे. जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमन्त्र एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धवठाकारे जनतेशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशामध्ये गद्दार म्हणून ओळख आहे. तीन जिल्यांमध्ये देखील कोणी ओळखत नव्हतं असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. रिफायनरी प्रकल्पावरून थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. याचदरम्यान ते म्हणाले की, बारसू येथील प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या असे आवाहन करत येथे रिफायनरी प्रकल्प होणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरी दौऱ्यावर असून बारसू सोलगाव, साखरकुंभे अशा गावांमध्ये उद्धव ठाकरे जात असून तेथील ग्रामस्थांच्या भावना ते जाणून घेत आहेत. आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहेत.

हे ही वाचा : 

घरातील जुने, मळकटलेले सोफे स्वच्छ करायचेत? मग वापरा ‘या’ सोप्या टिप्स

अजित पवारांकडून निर्णयाचे स्वागत, तर पुढील ८ दिवस करणार राज्यभर दौरा

Raj Thackeray यांनी काढले अजित पवारांचे व्यंगचित्र, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss