Saturday, July 27, 2024

Latest Posts

संजय राऊतांचा बळीचा बकरा पक्षश्रेष्ठींनीच केलाय, निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर टीका

पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या पसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे.

पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या पसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’मध्ये ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात (Shinde Group) गेलेल्या निलम गोऱ्हे बोलल्या आहेत. संजय राऊत यांना अनेक समजावण्याचा प्रयत्न देखील निलम गोऱ्हे यांनी केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळत नव्हतं. आमदारांना निधीही दिला जात नव्हता. पक्षश्रेष्ठी यांना जे हवे होते, ते संजय राऊतांकडून बोलून घेत होते. राऊत टोकाची भूमिका घेतात त्यावर मी आक्षेपही नोंदविला होता. त्यांना सल्लाही देण्यात आला होता. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनंही मांडता येतात. मात्र, त्यांनी ऐकले नाही. या प्रकरणात त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आले आहे, असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या (शिंदे गट) निलम गोऱ्हे यांनी केले आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या , महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आजारी पडले आणि त्यावेळी तब्बल दोन ते तीन आठवड्यांसाठी सर्वांचा संवाद थांबला. त्या मधल्या काळात पक्षात नेमकं काय सुरू आहे, नेमकं कोण काय करतंय? अशा बऱ्याच गोष्टी कळेनाशा झाल्या. आमदारांना निधी दिला जात नव्हता, यावरुन त्यांची नाराजी होतीच. तसेच, त्यांची दखल कोणीच घेत नाही, ही खंतही आमदारांच्या मनात होती. सगळंच विस्कळीत होतं. काय सुरूये काहीच कळत नाहीये, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

मी संजय राऊतांशी स्वतः बोलले. त्यांना आता आठवतंय की, नाही मला माहीत नाही. मला त्यांच्याबाबत आदरच होता मनात, तेव्हाही होता आणि आजही आहे. मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत भरपूर, त्यांचे काही शब्द पटत नाहीत मला. पण मी त्यांना म्हटलं की, राऊत तुम्ही आत्ताच जेलमधून आला आहात. एवढी टोकाची भूमिका घेत आहात. त्याऐवजी जरा थोडसे शांतपणे बोला. १०० टक्के आक्रमक बोलण्यापेक्षा, वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीने मांडले जातात. तसे तुम्ही विचार करा याबाबत. यावर ते मला म्हणाले की, माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि मी असाच बोलणार. आता त्यांनीच असं बोलल्यावर पुढे काय बोलणार. शेवटी असं आहे की, आपण सांगण्याचं काम करू शकतो. त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणारं होतं, पटणारं होतं. पक्षश्रेष्ठींना स्वतः जे बोलायचं होतं, ते त्यांच्याकडून बोलून घेत होते. त्यामुळे त्यांना पक्षानं बळीचा बकरा केलं, असे माझे मत आहे, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

हे ही वाचा:

कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू

POLITICS: सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss