Monday, May 20, 2024

Latest Posts

संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल, मिंधे गटाच्या अनेक टोळ्या…

काल रात्री संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तुफान राडा हा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री २ च्या सुमारास राडा झालयाची घटना घडली.

काल रात्री संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तुफान राडा हा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री २ च्या सुमारास राडा झालयाची घटना घडली. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळापासून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. संभाजी नगरातील राडा संपला असला तरी आता राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाल्या आहेत. यातच आता संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

आज संजय राऊत हे दिल्लीत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल हा केला आहे. सध्या जे फडणवीस दिसत आहेत ते पूर्वीसारखे फडणवीस नाहीत. फडणवीस निराश झाले आहेत. वैफल्यग्रस्त होऊन काम करत आहेत. त्यामागची कारणं शोधावी लागतील. जाहीर सांगता येणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर मायुसी का आहे? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच संजय औरंगाबादेत तणावर निर्माण केला जात आहे. या मागे कोण आहे हे गृहमंत्र्यांना कळायला हवं. हे शिवसेना करत नाहीये. हे डुप्लिकेट शिवसेना करत आहे. या सरकारचा हेतू आहे राज्यात अशांतता निर्माण व्हावी असाच आहे. दंगली व्हाव्यात असा या सरकारचा हेतू आहे. गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न आहे, असं सांगतानाच संभाजीनगरला जे झालं, ते सरकारचं अपयश आहे. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी, तणाव कायम राहावा म्हणून मिंधे गट काम करतोय, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच राज्यात अशांतता निर्माण करणं, हा शिंदे सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने नाराजी दिसते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज सरकार जबाबदार आहे. हे सरकारचं अपयश आहे. राज्यात असं वातावरण निर्माण व्हावं, ही सरकारची इच्छा आहे, त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करते आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.राज्यातील मंत्री मंत्रालयात भेटत नाहीत. बाहेर सरकारचं अस्तित्व नाही. म्हणून तर कोर्टाला या सरकारला नपुंसक आणि अस्तित्वहीन सरकार म्हणावं लागलं आहे. या सरकारचा जीव खोके आणि पेट्यात आहे. ज्या सरकारचा जीव खोक्यात आणि पेट्यात असतो त्याला नपुसंक म्हणतात. कोर्टाने बरोबर तोच मुद्दा उचलाल. सत्यमेव जयते यालाच म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, दोन एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा आहे. या घटनेमुळे या सभेवर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता, “याचा आमच्या सभेवर काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीची प्रत्येक सभा दणक्यात होईल. शिवसेनेच्या सभाही दणक्यात होतील”, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

तेही स्वप्नं बघायला लागले, तर कसं होणार राजकारणाचं? अजित पवारांना शिंदे गटाचा टोला

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss