Saturday, July 27, 2024

Latest Posts

गणपत गायकवाड मुद्यावरून राऊतांचा हल्लबोल, संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी

मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू आहे.

सध्या राज्यातील ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात एकाच मुद्द्यांमुळे राजकारण तापले आहे ते म्हणाले गणपत गायकवाड यांनी केलेले कृत्य. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर बंदुकीने गोळीबार केला. आणि वादाला सुरवात ही झाली आहे. काल रात्री गणपत गायकवाड यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे. आज याच मुद्यावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

यावेळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत म्हणाले आहेत की, या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचं असेल डोंबिवलीच असेल मलबार हिल्स असेल साताऱ्याचा असेल तर प्रत्येक ठिकाणी गुंड्यांना, माफियांना खत पाणी का?घालण्याचं काम सुरू आहे. अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी तिकडे कामाला लावला आहे. मी पुराव्यासह माहिती देईन. मुख्यमंत्री कार्यालयातून गुंड्यांना मदतीसाठी फोन केले जातात. पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. गणपत गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचा आम्ही समर्थन करत नाही. पण या राज्यात काय चालू आहे, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याचा उद्रेक आणि स्पोर्ट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झाला आहे. आमदार सांगत आहे मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला याला मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलं आहे. कारण काहीही असतील अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे. पोलिसांनी घेतली पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेने देखील घेतली पाहिजे असंराऊत म्हणले आहेत.

तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, गायकवाड बोलत आहेत माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत आणि शिंदे यांनी आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंदे यांच्याकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि शंभर कोटी पेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांच्याकडे कशा करता ठेवलेली आहे. त्या रकमेच्या पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी सीबीआयने याच्या तपासाचा विषय आहे. सरळ सरळ मनी लॉन्ड्रीग ची केस आहे जर हिम्मत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शहा गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपाची चौकशी केली पाहिजे. फडणवीस म्हणत आहेत चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं ? असा सवाल देखील यावेळी उपस्थित केला आहे.

 

तसेच राऊत पुढे म्हणाले आहेत की, आमदार पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग करतो आणि तुम्ही चौकशीचे आदेश देत आहात कोणाला मूर्ख बनवत आहात ? तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यावधी रुपये शिंदे यांच्याकडे ठेवले आहेत. कोणता पैसा आहे हा फडणवीस सांगा तुम्ही समोर येऊन हिम्मत असेल तर, नाही तर आम्ही सांगतो पैसा कुठून आला कोणाचा आहे .आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे. खून बलात्कार हे शिंदे यांच्या नावाने सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वकील दांपत्य आढाव त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. खंडणीसाठी आरोपी शिंदे यांचे नाव घेत आहेत आम्ही शिंदे यांची माणसं आहोत. काय करत आहेत विखे पाटील त्यांच्या मतदारसंघातला हे अलीकडचं प्रकरण आहे. एक वकील दांम्पत्य ऍडव्होकेट आढाव त्यांना कोर्ट परिसरातून किडनॅप करून त्यांचा मर्डर करण्यात आला. गणपत गायकवाड पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून जात आहे कोणाला पकडायचं कोणाला सोडायचं आणि कोणावर दाखल करायचा हे आपल्या राज्य आहे महाराष्ट्रात त्याने बोललं पाहिजे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत आहोत. गणपत गायकवाड यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे माझे कोट्यावधी रुपये आपल्याकडे आहेत, ते कसले आहेत आणि त्या पैशाचा पुढे काय केलं माझा सवाल ईडी ला आहे, माझा सवाल सीबीआयला आहे, माझा सवाल लाज लुजपत प्रतिबंधक खात्यातल्या प्रमुखांना आहे . आपण आयपीएस आहात या समोर आणि सांगा गायकवाड यांच्या आरोपावर तुम्हाला उत्तर द्यावा लागेल.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss