विनायक राऊत यांचा खळबळजनक दावा

विनायक राऊत यांचा खळबळजनक दावा

सध्या राजकारणात निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षामध्ये पक्ष बांधणीची कामे सुरु आहेत. आणि त्यामुळेच अनेक पक्ष हे एकमेकांना घबारवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शिंदे गतातिलकही आमदार आणि खासदार हे काहीसे वैतागलेले दिसत हं . त्याच बरोबर पक्ष बांधणी आणि विस्तार करताना प्रत्येकाला काही ना काही पद हे हवेच असते किंवा तशी आशा तरी मनात असते मात्र अजून विस्तार काही होताना दिसत नाहीये. त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि खासदार याना आता आपण पक्ष बदलून पक्षांतर अरुण चूक तर केली नाही ना असे वाटतील लागले आहे. त्यातच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मोठा दावा केला आहे.

शिंदे गटातील आमदार आणि खासदारांबद्दल खळबळजनक दावा केला होता. शिंदे गटातील २२ आमदार आणि ९ खासदार संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले होते. राऊत यांनी त्यांची बाजू मांडताना काहीं मंत्रांच्या नावाचा उल्लेख देकील केला. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री शंभूराज देसाई आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची नावं घेतली गेली आहेत. तसेच शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना निरोप पाठवेला आहे की आमची इथं गळचेपी होते. त्यानंतर गजानन कीर्तीकर यांच वक्तव्य बाकीचे तानाजी सावंत आंकाडतांडवानं बोलतात, तानाजी सावंताना बजेटचं मिळत नाही. त्यामुळं म्हणतात आगीतून फुफाट्यात पडलेलो आहे, असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला आहे. आमच्याकडे अनेक यामध्ये मंत्री असलेल्या लोकांनी सुद्धा उद्धव साहेबांकडे संपर्क साधायला सुरुवात केली आहे, असं विनायक राऊत म्हणाले. काही जणांनी प्रत्यक्ष आमच्यापैकी काही जणांशी बोलणं देखील सुरु केलेलं आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी २२ आमदार आणि ९ खासदार संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. यावर शंभूराज देसाई यांनी त्यांना लगेच प्रतिउत्तर देऊन त्यांनी त्यांची बाजू सेफ करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. ‘खासदार विनायक राऊत यांनी माझ्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे, असे केलेले वक्तव्य धादांत खोटे आहे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. आणि त्याचवेळेस त्यांनी सांगितले की , ‘राऊत यांनी दोन दिवसांत आपले म्हणणे मागे घेतले नाहीतर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे,’ असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

गेल्या वर्षी विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर आम्ही सुरतला गेलो तेव्हापासून उध्दव ठाकरे परिवारासोबत अर्धा सेकंदही माझे बोलणे झालेले नाही. तसेच कोणा त्रयस्थामार्फतही निरोप दिलेला नाही. विनायक राऊत यांनी केलेले वक्तव्य १००१ टक्के खोटे आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. महाविकास आघाडीतील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे आमच्याकडून वक्तव्य झाले होते. ते खोडून काढण्यासाठी राऊत बोलले असावेत. पण, त्यांनी माझ्याबाबतचे वक्तव्य मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

IPL २०२३ च्या फायनलला वरुणराजाची उपस्थिती ; वादळी वाऱ्यासह आगमन

राज ठाकरे जून महिन्यात येथे करणार दौरा, घेणार बैठका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version