Saturday, July 27, 2024

Latest Posts

पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. नुकतंच अजित पवार यांनी ट्विटरच्या मार्फत त्यांची पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून देखील त्यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

निवडणुक आयोगाने बहुमताच्या आधारावर हा निकाल दिला आहे. निवडणुक आयोगासमोर आम्ही जे काही मुद्दे मांडले होते. कायदेशीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना यावर आयोगाने शिक्कामोर्तब केल्याचं तटकरे म्हणाले. या निकालावर बोलताना शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. या निकालाने मला फार आश्चर्य वाटत नाही. कारण ज्या दिवशी आमची राष्ट्रीय मान्यता काढली गेली त्या दिवशीच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पक्ष आणि चिन्ह तुमच्या ताब्यात देऊ याच अटीवर हे सर्व झालं आहे. आमचं चिन्ह हे शर पवारच असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांसोबत किती आमदार?

– महाराष्ट्रातील ४१ आमदार
– नागालँडमधील ७ आमदार
– झारखंड १ आमदार
– लोकसभा खासदार २
– महाराष्ट्र विधानपरिषद ५
– राज्यसभा १

शरद पवारांसोबत किती आमदार?

महाराष्ट्रातील आमदार १५
केरळमधील आमदार १
लोकसभा खासदार ४
महाराष्ट्र विधानपरिषद ४
राज्यसभा – ३

पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे

दरम्यान, आता अजित पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणार आहेत. शरद पवार गटाने उद्यापर्यंत नवं नाव आणि चिन्हा न दिल्यास अपक्ष म्हटलं जाणार आहे. आता शरद पवारांची पुढची भूमिका काय असणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग

Raj Thackeray Live: काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार, नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss