Saturday, July 27, 2024

Latest Posts

शरद पवार यांनी केले मोठं विधान, म्हणाले…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच सगळ्याच लक्ष हे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांमध्ये चालू असणाऱ्या घडामोडीकडे आहे. सध्या शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांनी अनेक मुद्दे सविस्तर रित्या मांडले आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. अश्यातच सगळ्याच लक्ष हे अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांमध्ये चालू असणाऱ्या घडामोडीकडे आहे. सध्या शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांनी अनेक मुद्दे सविस्तर रित्या मांडले आहेत. यंदाच्या वर्षी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या निवडणूक या होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीत आहेत. विरोधीपक्षांनी एकत्र येत आघाडी केली आहे. नरेंद्र मोदी यांचा पराभव करणं आणि भाजपविरोधात मजबूत लढा देण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली. मात्र निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना चांगलंच उधाण आलं आहे. यावर आता शरद पवार यांनी इंडिया आघाडीतील वादविवादावर भाष्य केल आहे.

उडवली कोल्हापुरात माध्यमांशी बोलत असताना शरद पवार म्हणाले आहेत की, इंडिया आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यपूर्ती सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल याठिकाणी आम्ही परिस्थितीवर चर्चा अजून झाली नाही. काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष आहे. महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात. निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

 

महाराष्ट्रातील ३ जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झाला नाही उद्या याबाबत बैठक होणार आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आदर्श बाबत एक श्वेतपत्र काढले आणि जे व्हायचं ते झालं, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर शरद पवारांनी भाष्य केलंय.

हे ही वाचा:

सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया

Exclusive : ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss