spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आले अडचणीत, वाघाची शिकार केली अन्…

राज्यात अनेक घडामोडींना सध्या चांगलाच वेग आल्याचं चित्र दिसून येत आहे. अश्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Shinde group MLA Sanjay Gaikwad) हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. परंतु आता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता चांगलीच वर्तवली जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजंयतीच्या दिवशी म्हणजेच दिनांक १९ फेब्रुवारी रोजी एका स्थानिक वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. १९९७ मध्ये आमदार संजय गायकवाड यांनी एका वाघाची शिकार केली होती आणि त्या वाघाचा दात त्यांनी गळ्यात बांधला होता. आणि या बाबत संजय गायकवाड यांनी वक्तव्य केले आहे.

यावेळी बोलत असतात संजय गायकवाड म्हणाले आहेत की, बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो. संजय गायकवाड यांची ही मुलाखत व्हायरल झाली. मग वनविभागाला जाग आली. त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आमदार संजय गायकवाड यांची ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यांनी केलेल्या शिकारीची जोरदार चर्चा झाली. मग वनविभागाचे अधिकारी जागे झाले. त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्या नुसार आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच गळ्यातील तो दात जप्त करुन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

त्या मुलाखतीत त्यांना गळ्यात असणाऱ्या वाघाच्या दातासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. आमदार संजय गायकवाड यांनी राजेशाही थाटात कौतुकाने उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. त्या वाघाची १९८७ मध्ये मी शिकार केली होती. मुलाखत घेणाऱ्या पुन्हा विचारले वाघ होता की बिबट्या मग पुन्हा गायकवाड म्हणाले, वाघच…बिबट्या वगैरे तर मी असेच पळवतो.

हे ही वाचा:

भविष्यातील विजयाचं रणशिंग रायगडावरून फुंकलं जाणार- जयंत पाटील

लोकसभेसाठी आम्हाला जागा द्यावी हा आमचा आग्रह, आम्हाला सिरियसली घ्यावे – रामदास आठवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss