Saturday, July 27, 2024

Latest Posts

तर हा प्रभू श्री रामांच्या विचाराचा पराभव आहे – SANJAY RAUT

कोणाचा बॅास सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॅास पाकिस्तान मध्ये असतो. अशी भाषा राज्यामध्ये कोणी करत नाही. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य करावं. गृहमंत्र्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे. या समाजात सामाजिक स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हे चूकीचं आहे. सोहळ्याच्या दिवशी कोणी दंगली करत असतील तर हा प्रभू श्री रामांच्या विचाराचा पराभव आहे. तु्म्ही मतं केलेल्या कामावर मागा, प्रभु श्री रामाच्या नावावर किंवा देवाच्या नावावर भीक भिकारी सुद्धा मागतात. असे संजय राऊत नितेश राणे यांच्या मुद्यावर बोलले. त्यांनी तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारलेली आहे. जर हा सन्मानानी तोडगा निघाला असेल तर ठिक आहे. या निर्णयाने जर मनोज जरांगे समाधानी असतील तर आम्हाला काही बोलायचं नाही. असे मत खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाबाबत माध्यमांशी बोलतांना मांडले.

सरकारमध्ये एकवाक्यत्ता नाही

कोणाचं काही काढून देऊ नका. ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी काल गुलाल उधळला त्याने दुसरा समाज अस्वस्थ आहे. कॅबिनेट मधील १० मंत्री या विषयावर दहा तोंडांनी बोलत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यत्ता, एकमत नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भुमिकेच्या विरूद्ध मंत्री जेव्हा भुमिका मांडतायत, म्हणजे एकवाक्यत्ता नाही. महाराष्ट्राची सामाजिक स्थिती बिघडवून निवडणूक लढवणार असाल तर हे चुकीचं आहे. कुठलाही समाज एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, हा महाराष्ट्र एकसंध रहावा हीच आमची अपेक्षा असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

गोदा पट्ट्यातील आंदोलकांसाठी मनोज जरांगेंनी बोलवली बैठक

क्राउडफंडिंग मोहिमे अंतर्गत देणगी देणाऱ्यांना मिळणार राहुल गांधींची सही असलेलं टी-शर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss