Saturday, July 27, 2024

Latest Posts

त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे – Dhairyasheel Mane

लोकसभेचे उमेदवार शिवसेना-शिंदे गटाचे लोकसभा उमेदवार धैर्यशील माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नसल्याचे सांगितले. ‘चर्चा’ या ‘चर्चा’ असतात त्यामध्ये काही अर्थ नसतो. अशा चर्चा माझ्या उमेदवारीच्या आधीही सुरू होत्या. माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे मला उमेदवारी मिळाली. ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत मी गेलो आहे. उमेदवार बदलाचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतील. कोणत्याही लोकसभा उमेदवाराचं नाव त्यांनी घेतलेलं नाही. उमेदवार बदलायचा असता तर उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच बदलला असता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही. संभ्रम निर्माण करायची वेळ आता राहिलेली नाही. काल एक एप्रिल होतं, एप्रिल फूल म्हणून कार्यकर्त्यांनी विसरून जावे, असे धैर्यशील माने यांनी संजय शिरसाट यांच्या मुद्द्यावर सांगितले.

समोरच्या उमेदवाराला अद्याप पक्ष आणि दिशा सापडेना. त्यांची ससेहोलपट होत असून वैचारिक घालमेल आहे. नेमकं त्यांना काय करायचं हे सुचत नाही. एखाद्या वधूला नवरा पाहिजे पण त्याचे आई-वडील नको अशी परिस्थिती आहे. एका पक्षाचा पाठिंबा पाहिजे पण त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही पक्षांचा स्पर्श देखील नको. एकदा ‘एकला चलो रे’ म्हणतात तर एकदा पुढे जातात. तर एकदा तुमचं चिन्ह घ्यायला तयार आहे असे हे म्हणतात. तर एकदा मी माझ्या ताकदीवर पुढे जात आहे असे वेगवेगळे स्टेटमेंट ते करत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचं व्हिजन क्लिअर आहे. कोणाला वाईट म्हणून आम्ही मतं मागत नाही. स्वतःकडे स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंबासाठी ते पायऱ्या का झिजवत आहेत? असा सवाल माने यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल केला.

स्वाभिमान असेल आणि लाचारी पत्करायचे नसेल तर कोणाशी चर्चा करायचा संबंध येत नाही. त्यांनी त्यांचा मार्ग आधीच स्वीकारला आहे. मी कसा निवडून येईल हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. शेट्टी हे स्वतः पूरतं राजकारण करतात. नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत करता येत नाही त्यासाठी स्वाभिमानाने राहाव लागत आहे. ते एका भूमिकेशी कधीही ठाम राहिले नाहीत. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे मतदार संघातील प्रत्येक मतदाराने पाहिले असल्याचे धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल सांगितले.

हे ही वाचा:

खेळाडू Hardik Pandya ने घेतला ब्रेक? सामन्यात असणार की नाही?

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss