Saturday, May 4, 2024

Latest Posts

ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही, काय म्हणाले Ajit Pawar?

अमरावतीतल्या प्रचार दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी एका माध्यम वाहिनीशी संवाद साधला असता अनेक बाबतीत खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार जेव्हा जात होते तेव्हा शरद पवारांना त्यांनी पत्र दिलं होतं. जयंत पाटील (Jayant Patil), राजेश टोपे (Rajesh Tope), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), प्राजक्त तनपुरे (Prajkat Tanpure) या सर्वांनी त्यावर सह्या सुद्धा केल्या होत्या. राजेश टोपे यांचे पत्र ते स्वतः घेऊन गेले होते आणि मला सांगण्यात आलं होतं की, अमित भाईंशी चर्चा करा पण नंतर निरोप असा आला की, चर्चा फोनवर होत नाही. कारण तुमचा मागचा अनुभव चांगला नाही. मागे पाठिंबा न मागताही तुम्ही पाठिंबा दिला होता मग ती चर्चा रद्द करण्यात आली. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. 

सुप्रिया सुळे (Supriya Sule) अर्थात बहिणीच्या विरोधात प्रचार करताना वेदना होतात का असा प्रश्न जेव्हा अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीत भावनिक नातं चालत नाही ७ मे पर्यंत भावनिक मऊ व्हायचं नाही, असं ठरवलं आहे. बारामतीचा (Baramati) अधिक विकास पाहिजे असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून तो विकास करता आला पाहिजे आणि हा विकास जलद गतीने होणे गरजेचे आहे. माझ्यासाठी निवडणुका नवीन नाहीत. समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे. अशीच रणनीती आम्ही आणतो आणि करतो. बारामतीच्या जागा लढत असताना समोरच्या उमेदवार त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत. ही लढाई भावकी किंवा गावकीची लढाई नाही. देशासाठी ही लढाई लढायची आहे, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांमध्ये लढाई सुरू आहे. केंद्रात जाणारा खासदार हा सत्ताधारी विचारांचा जर असेल तर काम चांगल्या पद्धतीने करता येतं आणि मतदारसंघातला विकास हा जलदगतीने होतो, असे यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री जरी असलो, तरी एक बाप म्हणून मला अभिमान वाटतो- CM EKNATH SHINDE

महाराष्ट्रातील काही ठिकाणांना उष्णतेपासून दिलासा तर ठाण्याला Yellow Alert

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss