Saturday, May 4, 2024

Latest Posts

महाराष्ट्रातील काही ठिकाणांना उष्णतेपासून दिलासा तर ठाण्याला Yellow Alert

सध्या राज्यात उष्णतेच्या लाटसह पावसाचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे देशांमध्ये एकाच वेळी ऊन एकाच वेळी पावसाळा तर सकाळच्या वेळेमध्ये हिवाळा असल्यामुळे तिन्ही ऋतूचे एकत्रीकरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भामध्ये काही प्रमाणात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई आणि ठाण्यात उष्णतेच्या लाटेपासून काही संधीला सांभाळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा येथे अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडासह अवकाळी पावसाने सरी पडल्या. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना आता उकाडापासून दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम काही भागांमध्ये विजांच्या गडगडासह पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच, मुंबई आणि ठाण्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण आज ठाणे आणि मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. तसेच पुढील २४  तासांमध्ये मुंबई शहरासह उपनगरात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

अभिषेक शर्माने उडवला दिल्लीच्या बॉलर्सचा धुव्वा

उद्धव ठाकरेंचा Amit Shah आणि PM Modi यांच्यावर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss