Saturday, May 4, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री जरी असलो, तरी एक बाप म्हणून मला अभिमान वाटतो- CM EKNATH SHINDE

कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून काम करत आहेत. मागील १० वर्षात त्यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘विकास दशक – १० वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची!’ या कार्य अहवालाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
गेल्या १० वर्षात मेहनत, कष्ट, जिद्द याच्या जोरावर कल्याण लोकसभेत डोंगराएवढी कामे झाल्याचे सांगत डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने तुम्हाला व्हिजनरी लीडर मिळाल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री जरी असलो, तरी एक बाप म्हणून मला अभिमान वाटत असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या १० वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या १० वर्षांचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
पाचवी सहावी लाईन, कल्याण स्टेशन रिमॉडेलिंग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासह रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.

डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरमधील मोफत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे अशी कामे केल्याची माहिती दिली.

Latest Posts

Don't Miss