Saturday, July 27, 2024

Latest Posts

हीच आहे आजच्या अर्थसंकल्पाची महती – Chitra Wagh

२०२४-२५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. सादर झालेल्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले होते. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प ठरला. हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड आणि अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट घेतली होती. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अंतरिम बजेट देशासाठी चांगलं असेल असं कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली. या बजेटमध्ये तीन महिन्यांसाठी खर्च करायच्या रकमेचा लेखाजोखा मांडण्यात आला. बजेट सदर झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी बजेटबाबत त्यांचे मत व्यक्त केले आणि त्यासोबतच, सरकारचे कौतुक देखील केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बजेटबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.

आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कष्टकरी,गरजू महिलांचा विचार केला गेला, ही आनंदाची बाब आहे.महत्वाचं म्हणजे तिहेरी तलाक प्रथा बंद करून मुस्लीम महिलांना त्यांचा हक्क दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ‘आशा’ कर्मचाऱ्यांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळण्याची मागणीही पूर्ण केली गेली. यासोबत संसदेत महिला आरक्षणासाठी कायदा करण्याचा निर्णय महिलांचे सामाजिक स्थान अधिक बळकट करेल. PM आवास योजनेत देखील ७०% घरे महिलांना देण्याचा निर्णय घेत सरकारने महिलांना या अर्थसंकल्पात महत्वाचे स्थान दिले आहे. याशिवाय कष्टकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेत अर्थव्यवस्थेला चालना देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार..! असे यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सोशल माध्यमाच्यावतीने म्हणाल्या.

यासोबतच, २०२४ चे बजेट हे महिलांना शारीरिक आणि आर्थिक ताकद देणारं असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी ९-१४ वयोगटातील मुलींना मोफत लसीकरण, गर्भवती महिला व नवजात बालकांच्या सक्तीच्या लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य योजना, आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आता सर्व आशा व अंगणवाडी सेविकांनाही मिळणार, पीएम आवास योजनेंतर्गत पुढच्या पाच वर्षांत २ करोड घरे महिलांना मिळणार, लखपती दीदींची संख्या वाढविणार, २ कोटींवरून ३ कोटींपर्यंतची वाढ. प्रत्येक महिलेस प्रतिष्ठा, सन्मान आणि शक्ती… हीच आहे आजच्या अर्थसंकल्पाची महती…अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी बजेटचं स्वागत करत सरकारचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss