शिवसेना (Shivsena) नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज (शनिवार, १३ एप्रिल) नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करत, ‘रोज सकाळच्या पत्रकार परिषदेला आपण एवढं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही.’ असे व्यक्तव केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबर विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या काही जागांवर मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला. या संदर्भात मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. अन्य जागांचा आढावा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चा झालेली नाही कालच्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावर ही चर्चा झालेली आहे.” “आशिष शेलार (Ashish Shelar) हे काल माझ्यासोबत होते. महायुतीचा प्रचार ते करत आहेत. आम्ही देखील महायुतीचा प्रचार करत आहोत. वैयक्तिक कोणाचाही प्रचार सुरू झालेला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा ही अजून कोणालाही फायनल झालेली नाही. नेते मंडळींच्या चर्चेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा ही महायुतीच्याच उमेदवाराला मिळणार आहे. आम्ही देखील महायुतीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार आहोत.”
रत्नागिरी – सिंधुदुर्ग जागावाटपाबाबत महायुतीत वाद आहेत. त्याबाबत ते म्हणाले, “जे काही निर्णय होतील त्या निर्णयाबरोबर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षातील सर्व कार्यकर्ते काम करतील. नारायण राणे हे महायुतीतील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी माझं म्हणणं मांडणं हे चुकीच आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा ही अजून कोणालाही फायनल झालेली नाही. नेते मंडळींच्या चर्चेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागा ही महायुतीच्याच उमेदवाराला मिळणार आहे “
उदय सामंत यांचे बंधू आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून इच्छूक असलेले किरण सामंत यांच्या व्हाट्सॲप स्टेटसने राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा व्हिडीओ स्टेटसला ठेऊन पक्षाला धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता. त्यावरून बोलताना उदय सामंत म्हणाले, “त्यांना अजित पवारांच भाषण आवडल म्हणून टाकलेला तो व्हिडिओ होता. यामागे काही राजकीय हेतू आहे असे मला वाटत नाही. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे.”
हे ही वाचा:
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.