Thursday, May 2, 2024

Latest Posts

CM Eknath Shinde आज कोल्हापूर दौऱ्यावर, मतदारसंघातील परिस्थितीवर काय बोलणार?

राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी महायुतीत (Mahyuti) काही जागांवरून तिढा कायम आहे. अश्यातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज (शनिवार, १३ एप्रिल) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापूर (Kolhapur Loksabha Constituency) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये (Hatkanangale Loksabha Constituency) महायुतीचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी हा दौरा आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमोर अनेक समस्यांना आव्हान असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हे निवडणूक लढवणार असून त्यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचे दिसत आहे. हातकणंगलेमधून भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे धैर्यशील मानेच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हातकणंगलेमधे चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आज हातकणंगलेमधील शिलेदारांसोबत काय चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर दौऱ्यात दोन्ही उमेदवारांसाठी ते ताकद लावणार असून यासाठी त्यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. म्हणून, दोन्ही उमेदवारांसाठी कोल्हापुरात सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आल्यानंतर हॉटेलमध्ये विविध मान्यवरांच्या भेटी घेतील. तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरीमुळे ते काय भूमिका घेतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय, कोल्हापूरचे संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी करवीर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कोल्हापुरात वातावरण गरम आहे. यावरून मुख्यमंत्री काय बोलणार याकडेसुद्धा सर्वांचे लक्ष असणार आहे. कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील (Satej Patil) यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली होती.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss