Friday, April 26, 2024

Latest Posts

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही उभारणार रोहिदास भवन

Sant Rohidas Maharaj : मुंबईत संत रोहिदास भवन उभारण्यात येणार असून मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही संत रोहीदास भवन उभारण्यात यावे अशी मागणी ठाण्यातील पंचायत समितीच्या समाजाने केली आहे. युती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Sant Rohidas Maharaj : मुंबईत संत रोहिदास भवन उभारण्यात येणार असून मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही संत रोहीदास भवन उभारण्यात यावे अशी मागणी ठाण्यातील पंचायत समितीच्या समाजाने केली आहे. युती सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर भवनाची उभारणी झाली, त्यानुसार ठाण्यात देखील लवकरात लवकर संत रोहीदास भवनाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालय येथे संत रोहिदास जयंती निमित्ताने रोहीदास समाज पंचायत संघ आणि विभाग क्रमांक १३ च्या वतीने ठाण्याचे अध्यक्ष प्रदीप सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई चे अध्यक्ष मयूर देवळेकर यांनी भवन उभारण्या संदर्भात आश्वासन दिले.

मुंबई येथे संत रोहिदास भवनाच्या उभारणीसाठी ११ कोटी रूपयांचा निधीही वितरीत करण्यात आला असून येत्या दोन वर्षात भवनाचे काम पूर्ण करण्यात आले. परेलमधील संत रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई संचालित बाबू जगजीवनराम यांच्या नावाचे मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह जीर्ण झाले होते. त्यामळे ते बंद होते. दरम्यान, या जागेवर संत रोहिदास भवनाची उभारणी करण्यात यावी, अशी रोहिदास समाज पंचायत संघाची मागणी होती. त्यानुसार संत रोहिदास भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लागणाऱ्या ११ कोटी रूपयांची तरतूदही करण्यात आली होती. याच धर्तीवर ठाण्यातही मध्यवर्ती ठिकाणी जागा बघून संत रोहीदास भवनाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी मेळाव्यात करण्यात यावी.

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार भवन उभारण्यासाठी सकारात्मक असून लवकरात लवकर यांची अमलबजाणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे यावेळी देवळेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कोषाध्यक्ष दिगंबर आर्लेकर, राजन पलावनकर, सूर्यकांत दाभोळकर ,नैनेश शिरकर, ज्ञानेश मासावकर,राजन वायंगणकर ,शिल्पा शिरकर, शीतल मेढेकर आणि नौपाडा पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आदी जण उपस्थित होते.

संत रोहिदास भवनामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, भव्य ग्रंथसंपदा असलेले वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच मागासवर्गीय समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रदीप सावर्डेकर यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

Sharad Pawar Live, राजकीय चर्चांवर अखेर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण, कुठलीही बैठक ही…

महाराष्ट्राच्या राजकारणात आता दुसरा भूकंप? धाकट्या पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss