Tuesday, April 23, 2024

Latest Posts

राजापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, म्हणाले…

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर असणार आहेत.

Shiv Sena Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख (Shiv Sena UBT) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) हे पुढील महिन्यात कोकण दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे हे चार आणि पाच फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर असणार आहेत. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. काल सावंतवाडी, कणकवली अंडी सिंधुदुर्ग येथून उद्धव ठाकरे यांनी जनेतला संबोधित केले आहे. तर आज आज राजापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली आहे.

राजापूर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना म्हटलं की, मी पंतप्रधानांना नाही, ते मला शत्रू मानतात. कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, शिवसेना चोरली. ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळात मदत केली होती, त्या बाळासाहेबांची त्यांनी चोरी केली. चोराला मदत केली, चोराला मुख्यमंत्री म्हणून बसवला. तिकडे नितीश कुमारांना तोडलं, सोरेन यांना तुरुंगात टाकलं. केजरीवालांच्या मागे लागलेत. राजन साळवी, वायकर, सूरज चव्हाण यांच्याही मागे लागले आहेत.

 

तसेच उद्धव ठाकरे हे पुढे म्हणाले आहेत कि, ‘राजन साळवी यांच्यावर आरोप केले. राजन साळवी यांची मालमत्ता सापडली असेल तर, राजापुरामध्ये जे नवीन इच्छुक उमेदवार खर्च करत आहेत, त्यांच्या घरी आधी धाड टाका. त्यांनी पैसे कुठून आणले, ज्यांच्या घरी धाड टाका. त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, जाहिराती करतायत, त्यांची चौकशी करा. ‘ राजन साळवींच्या घरी काही मिळालं नाही म्हणून वस्तूंची किंमत काढली. एसीबी अधिकाऱ्यांनी शिवरायांच्या मूर्तीची किंमत लावली. मिंधेच्या पक्षात जात नाही म्हणून राजन साळवींवर कारवाई करण्यात येतेय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. रायगड मधल्या मुस्लिम बांधवांनी आम्हाला मराठीतील कुराण दिले, त्यांना आपले हिंदुत्व कळलं आहे. राजनला धन्यवाद आणि त्याची पाठ थोपटायला आलोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘देशभरात यांच्या कारभाराचे चटके बसतायत. आमचं हिंदुत्व धर्माधर्मात आग लावणारं नाही. शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत कशी लावता असा सवालही उद्धव ठाकरे यांनी एसीबी अधिकाऱ्यांना विचारला आहे. कारण त्यांचे दिवस फिरले तसे तुमचेही फिरतील’, असंही त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

Aaditya Thackeray PC Live : निवडणूक तोंडावर आल्यावर लोकार्पणाचे कार्यक्रम…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss