Saturday, July 27, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर थेट निशाणा – गद्दारांना खोके कुणी पुरवले, हे आज कळलं”

भाजपवाले धारावीबरोबर देवनार आणि अभ्युदय नगरही अदानीच्या घशात घालायला निघाले आहेत. देवनारची तीनशे साडेतीनशे एकर जागा हडपण्याची योजना त्यांनी आखली आहे

भाजपवाले धारावीबरोबर देवनार आणि अभ्युदय नगरही अदानीच्या घशात घालायला निघाले आहेत. देवनारची तीनशे साडेतीनशे एकर जागा हडपण्याची योजना त्यांनी आखली आहे. वेळ आली तर पापडासारखं वाळत घालू, असंही ते म्हणाले.धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग समूहाला मिळालेलं आहे. परंतु, या कंत्राट भरतीत अदानींचा फायदा जास्त असल्याचं म्हणत शिवसेनाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज याविरोधात मोर्चा काढत आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभा अधिवेशन सुरु आहे.

ठाकरे गटाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाच्या बीकेसी येथील कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कार्यालयाबाहेर बरिकेट्स लावण्यात आले आहेत. मुंबईतील धारावी पुनर्विकासाविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत घेण्याची सक्ती मुंबईतील विकासकांवर करण्यात आली आहे. धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. धारावीच्या परिसरात अदानी हटाव अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत.

धारावीतील टी-जंक्शनवरून हा मोर्चा निघणार आहे. बीकेसीमधील अदानींच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात बॅनर्स लावण्यात आलेत आहे. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकासाचं काम अदानी उद्योग समूहाला मिळालेलं आहे. परंतु, या कंत्राट भरतीत अदानींचा फायदा जास्त असल्याचं म्हणत शिवसेनाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज याविरोधात मोर्चा काढत आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभा अधिवेशन सुरु आहे. धारावीतील लोकांना ५०० फुटांचं घर मिळालं पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

३०० पोलिसांचा बंदोबस्त
धारावी ते बीकेसीपर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ ते ५ तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, महाराष्ट्र गृह रक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आदी ३०० च्यावर पोलिसांचा या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धारावी ते बीकेसी मैदानापर्यंत हा पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्तही या मोर्चावर विशेष लक्ष ठेवून आहेत. भाजपच्या जावयाला अदानीला आंदण देण्यासाठी ही मुंबई महाराष्ट्राला दिलेली नाही. मुंबई संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. कोस्टल रोडला आम्ही टोल लावणार नव्हतो पण यांनी टोल लावणार आहेत. पोलिसांना सांगतो की सरकार येतं आणि जातं तुम्ही तुमचं रेकॉर्ड खराब करु नका. काही निवृत्त पोलिसांचे गुंड इथं सोडले आहेत, त्यांची गुंडगिरी ठेचून काढा आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss