Tuesday, April 16, 2024

Latest Posts

UNION BUDGET 2024: अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक- Jayant Patil

दिनांक १ फेब्रुवारी रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सादर झालेल्या या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हे लागले होते. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा आणि अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांचा सहावा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget) ठरला. सदर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबद्दल काही चांगल्या तर काही वाईट प्रतिक्रिया येत आहेत. या बजेटबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे मत मांडले आहे. अंतरिम बजेट हे धूळफेक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेले अंतरिम बजेट (Interim Budget) ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेटमध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो. अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच, बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही. निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला असा हा अर्थसंकल्प आहे. असे मत जयंत पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले.

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं बजेटमध्ये काहीच नाही

यासोबतच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सुद्धा अर्थसंकल्पाबाबत निराशा व्यक्त केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचं बजेटमध्ये काहीच नाही. अंतरिम बजेटमध्ये फार मोठ्या अपेक्षा नाहीत. गेल्या दहा वर्षात सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही, ते आता तीन महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार? केलेल्या फुटकळ तरतुदी अत्यंत निराशाजनक असल्याचे राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss