Saturday, May 18, 2024

Latest Posts

Raj Thackeray यांची स्मरण शक्ती कमी म्हणून… Vinayak Raut यांचे ताशेरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (शनिवार, ४ मे) नारायण राणे (Narayan Rane) यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे सभा घेतली होती. यावेळी त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि नारायण राणे यांचे कौतुक करात विरोधकांवर खरपूस टीका केली. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख (Shivsena UBT) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीका करत राज ठाकरे यांनी “साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते तेव्हा उद्योग धंदे का बाहेर गेले?” असा सवाल विचारला. यावर आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, “राज ठाकरेंनी नेहमी सारखी उद्धव ठाकरेंचा द्वेष करण्यासाठी सभा घेतली. रीफायनरी संदर्भात त्यांनी जे बोलले ते त्यांचे कान भरल्यामुळे बोलले आहेत. राज ठाकरेंनी काल जी टीका केली त्यांनी रिफायनरी संदर्भात जर थोडी माहीती घेतली असती तर ती टिका केली नसती. राज ठाकरे ज्यांच्या बुडता जहाजाला पाठींबा द्यायला आलात ते रिफायनरीला समर्थन देणारे राणे खरे की विरोध करणारे खरे? आम्ही जर रीफायनरीच्या बाजूची एक इंच जरी जागा घेतली असेल तर ते राज ठाकरेंनी सिद्ध करून दाखवावे नाहीतर त्या गावात येऊन लोकांची माफी मागावी.”

पुढे ते म्हणाले, “रिफायनरी होणार त्या परीसरात १४ हजार वर्षांपुर्वीची कातळ शिल्प आहेत,ती राज ठाकरेंनी येऊन पाहावी. कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीला समर्थन करणारे राज ठाकरे खरे? राज ठाकरेंची स्मरण शक्ती कमी झाली मोठ मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले ते देवेंद्र फडणवीस व शिंदेच्या कारकिर्दीत गेले. भारतीय जनता पक्षाची लाचारी पत्करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना नाही. विनायक राऊत ने १०८ वेळा लोकसभेत उभे राहून प्रश्न मांडले.”

नारायण राणे यांच्यावर टीका करत ते म्हणाले, “आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे सोबत एक निष्ठावंत राहीलो आहोत, त्यामुळे कोकणची जनता आमच्या सोबत राहील. कुडाळ एमआयडीसीतील भुखंड नारायण राणे पुरस्कृत भुमाफीयांनी अडवून ठेवले आहेत. राणेंच्या मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची लूट होते आहे. महसूल मंत्री असताना ४२ हजार हेक्टर जमीनी वनसंज्ञामध्ये टाकली. खुनशी प्रवृत्तीचा बिमोड कोकणवाशी केल्या शिवाय राहणार नाही. नारायण राणेंच्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक भुखंड हडप केले आहेत. एमएसएमई खात्याचे खरे लाभार्थी नारायण राणे आहेत. रक्तरंजित इतिहास या सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या कारकिर्दीत झाला आहे. राणे मतदारांना एक एक हजार रूपयांचे पाकीट देतात. काही लोंकानी त्याची पाकिटे परत केली आहेत. शिवसेनेत राणे होते तेव्हा ते विकास काम करत होते मात्र आता ते काय दिवे लावतायत ? ७० एकर जागा कुडाळ एमआयडीसीत राणेंच्या कंपनीची आहे. सात तारीखला दुपारी अपप्रवृत्ती गाडली जाईल.”

हे ही वाचा:

“मला भुमिका पटली नाही म्हणुन,मी मोदींच्या विरोधात होतो”; राज ठाकरेंचा खुलासा

“राज ठाकरेंचा देव बदलु शकतो” ;संजय राऊतांचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss