Monday, April 22, 2024

Latest Posts

आम्ही कुणाचे तोंड बंद करू शकत नाही- Chhagan Bhujbal

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले. महाराष्ट्र सदन निकालाबाबत छगन भुजबळ म्हणाले की, सध्या चुकीची बातमी सुरु आहे. आम्हाला त्यातून क्लीन चिट मिळाली आहे. एका दुसऱ्या व्यक्तीबाबत ते केस सुरू आहे. कुणाचे तोंड आम्ही बंद करू शकत नाही. असे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला असता, छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकवरून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू. शिंदे गटाचे सिटींग खासदार आहेत, भाजपाचे आमदार आणि नगरसेवक जास्त आहेत. त्यामुळे ते दावा करू शकतात. नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू, असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले. यासोबतच, भुजबळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. किती मनापासून आपण काम करतो हे महत्वाचे आहे. अनेक नेत्यांचे शिक्षण कमी असताना देखील त्यांचे काम मोठे असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हे ही वाचा:

खेळाडू Hardik Pandya ने घेतला ब्रेक? सामन्यात असणार की नाही?

महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा प्रतिनिधी म्हणून…काय म्हणाले ROHIT PAWAR?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss