Tuesday, May 21, 2024

Latest Posts

आम्ही केली ती गद्दारी मग तुमचे काय?, Dhananjay Munde यांचा Sharad Pawar यांना सवाल

बारामती येथे लोकसभा मतदारसंघातील पुरंदर या ठिकाणी राष्ट्रवादी युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय मुंडे यांनी भूतकाळातील गोष्टी काढून शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांनी १९७८ मध्ये  महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दल त्याला संस्कार म्हणायचे आणि आता अजितदादांनी वेगळं जाऊन जे केलं त्याला गद्दारी म्हटले जाते. पण शरद पवार यांनी २०१७ मध्ये शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी दिल्लीत कोणाच्या घरी आणि कधी बैठक घेतली होती, याचा सर्व तपशील माझ्याकडे पुराव्यासकट असल्याचा खुलासा अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

अजित पवार यांनी जे केले आहे ते एकट्याने केले नाही. आमच्यासारखे असंख्य जणांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. पण २०१४ मध्ये बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय हा संस्काराचा भाग आणि आता अजित पवार यांनी केलं ती म्हणजे गद्दारी असं म्हणायचं का? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. २०१७ मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे आणि कधी बैठक झाली याचे व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहेत. ही बैठक दिल्लीत कोणाच्या घरी झाली याचा तपशील मी सांगू शकतो. या बैठकीला शिवसेनेला कसं बाजूला काढायचं, यावर चर्चा करण्यात आली होती. यासोबतच जे काही घडलं होतं, त्याला संस्कार म्हणायचे आणि आम्ही जे काही केलं त्याला गद्दारी म्हणायची का? असा सवाल करत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका केली.

आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेनंतर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना उत्तर दिले आहे जनसंघ किंवा भाजप पक्ष नव्हता पुलोद सरकारमध्ये एस.एम.जोशी यांची जनता पार्टी होती. त्यांनीच शरद पवार यांच्यासमोर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व सोडणारे हशू आडवाणी त्या सरकारमध्ये मंत्री होते. हा सगळा इतिहास धनंजय मुंडे यांनी वाचावा, उगाच काहीतरी बोलू नये असे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

हे ही वाचा:

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss