Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Arjun Dangle Exclusive: आंबेडकरी चळवळ विखुरलेली असली तरी संपली नाही

ज्येष्ठ दलित नेते आणि साहित्यिक अर्जुन डांगळे यांची नुकतीच टाइम महाराष्ट्र चे संपादक राजेश कोचरेकर यांच्याशी  संविधान, डॉ आंबेडकर, मोदी आणि त्यांची या सगळीकडे बगण्याची दृष्टी या संबंधित मुलाखत झाली. 

ज्येष्ठ दलित नेते आणि साहित्यिक अर्जुन डांगळे (Arjun Dangale) यांची नुकतीच टाइम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांच्याशी  संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची या सगळीकडे बघण्याची दृष्टी या संबंधित मुलाखत झाली.

दलितांमधील विखुरलेले नेते आणि शक्तिपात झालेली दलितांची राजकीय शक्ती या शक्तीकडे साहित्यिक म्हणून बघताना तुम्हाला किती वेदना होतात? या प्रश्नावर अर्जुन डांगळे म्हणाले, ‘वेदना तर होतातच. त्या वेळी बाबासाहेबांनी आपल्यासाठी एक शक्ती उभी केली. एखादा मुद्दा घेतल्यानंतर ब्रिटिशांपासून काँग्रेसपर्यंत त्यांना विचार करावा लागायचा कि यात बाबासाहेबांची काय भूमिका असेल. संबंध आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणून काय भूमिका असेल याचा विचार केला जात नाही. अराजकीय पटलावर चळवळ जरी अदखलपात्र झाली असेल तरी वैचारिक पातळीवर ती अजूनही आहे. आंबेडकरी चळवळ विखुरलेली असली तरी संपली नाही. आज १०८ देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते किती अभिमानाची गोष्ट आहे ही’.

बाबासाहेबांचं संविधान बदलण्यासाठी भाजप पावलं उचलतंय हे बाबासाहेबांच्या अनुयायांना समजतंय? तेवढ्याच जागृकतेनं ते येणाऱ्या निवडणुकांकडे पाहतील?

हो माजी IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील सर्वजण एकत्र आले आहेत. ही वेळ भाजपला आणि संघ परिवाराला सत्तेपासून दूर करण्याची आहे. हे सर्वांना जाणवलं आहे म्हणून उस्फुर्तपणे सर्व जण संघटित होत आहेत.

भाजपला हरवलं पाहिजे अस म्हणता मग दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रास देणाऱ्या काँग्रेसला, राहुल गांधीला जिंकवायला पाहिजे का ?

त्यावेळेस ते सत्तेत होते. जिथे लढे द्यायचे तिथे दिले. आता काँग्रेस सत्तेत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा देखील नव्हता संविधान बदलण्याचा. बाबासाहेबांनी अधिकार दिलाय संविधानाचा तर संघटित होऊन बाहेर पडू.

मोदींनी जे काही केलं ते काहीच उपयोगाचं नव्हतं का?

काय केल मोदींनी? लोकांना लाचार बनवलय घर देणं गॅस मध्ये सबसिडी देणं, अश्या जाहिराती करणं. त्यांनी जर हे केलाय तर त्याची आकडेवारी जाहीर करावी.

काँग्रेसने दलितांसाठी किंवा इतरांसाठी जे केलं ते योग्य आणि मोदींनी जे केलं ते अयोग्य असा म्हणायचय का तुम्हाला ?

असं मी म्हणत नाही. एखाद्याच विचारस्वातंत्र्य, स्वाभिमान काढून घेता. भाजपची लोक बाहेर जाऊन सांगता कि गांधींच्या देशातून आलो आहोत. आणि परत आल्यानंतर त्यांची हत्या केलेल्या गोडसेंचा सत्कार करता. बिल्किस बानो सारख्या महिला असतील त्यांच्या आरोपींचा तुम्ही जेल मधून काढून सत्कार करता. मानवतावाद इथे कुठे आहे.

हे ही वाचा:

Sangali मध्ये BJP ला मोठा धक्का, चार नगरसेवकांनी दिला Vishal Patil यांना पाठिंबा

Milind Narvekar ठाण्यातून लढणार, ठाकरेंना सोडणार? CM Shinde काय करणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss