Monday, May 20, 2024

Latest Posts

Mahavikas Aghadi चा निर्णय तरी काय? Vanchit सोबत की Vanchit शिवाय?

महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) मधून वंचित बहुजन आघाडी (VANCHIT BAHUJAN AGHADI) पक्ष बाहेर पडणार की वंचित बहुजन आघाडी (VANCHIT BAHUJAN AGHADI) सह महाविकास आघाडी (MAHAVIKAS AGHADI) मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या सामन्यांमध्ये सामोरे जाणार आहे. याकडे राजकीय वातावरणात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाबद्दल काय भूमिका घ्यायची यावर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची शुक्रवारी अर्थात २२ मार्च रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीला ठाकरे गटाकडून संजय राऊत  (Sanjay Raut) काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तसेच नाना पटोले (Nana Patole) उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या (VANCHIT BAHUJAN AGHADI) वतीने वतीने पत्र जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये थेट काँग्रेसला सात जागांना पाठिंबा देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या घटक पक्षांची मते समजून घेतली. त्यानंतर उपस्थित काही नेत्यांनी वंचित बहुजन आघाडी बाबत स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी व्यक्त केली होती. वंचित बहुजन आघाडी बाबत चर्चा सुरू असतानाच सांगली (Sangli), रामटेक (Ramtek), भिवंडी (Bhiwandi), मुंबई उत्तर पश्चिम आणि दक्षिण मध्य मुंबई याबाबत देखील चर्चा करण्यात आली. सध्या काँग्रेस (Congress) ने भिवंडी (Bhiwandi) लोकसभेसाठी मागणी केली आहे. तरीसुद्धा शरद पवार यांच्या वतीने भिवंडी लोकसभेसाठी दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा दोन दिवसात संपण्याची शक्यता असली तरीही वंचित बहुजन आघाडी (VANCHIT BAHUJAN AGHADI) सोबत येण्याची शक्यता कमी होताना दिसून येत आहे.

हे ही वाचा:

देशात पहिली निवडणूक कधी पार पडली? कोणत्या राज्यात झाले पहिले मतदान, जाणून घ्या सविस्तर माहिती

महाविकास आघडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग, हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? एकनाथ शिंदेनी साधला ठाकरेंवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss