Saturday, May 11, 2024

Latest Posts

देशात पहिली निवडणूक कधी पार पडली? कोणत्या राज्यात झाले पहिले मतदान, जाणून घ्या सविस्तर माहिती

देशात सध्या सगळीकडे लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचे वारे वाहत आहेत.

देशात सध्या सगळीकडे लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान निवडणूक होणार असून ४ जून ला निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. यंदाची निवडणूक ही लोकसभेची १८ निवडणूक असणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का देशातील पहिली निवडणूक कधी आणि कशी झाली होती? किती महिने ही सगळी प्रक्रिया चालली? चला तर जाणून घेऊया..

१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. त्यानंतर लोकशाही व्यवस्था स्विकारल्यानंतर देशात निवडणूका होणार होत्या. १९४७ ला भारताला स्वात्रंत्र्य मिळाले असले तरी देशात पहिली निवडणूक ही १९५२ साली झाली. या निवडणुकीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर मार्च १९५० साली देशात पहिला निवडणूक आयोग नेमण्यात आला होता. देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमान सेन होते. सुकुमान सेन यांच्या नेतृत्वाखाली देशाची पहिली निवडणूक प्रक्रिया पार पडली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांची प्रक्रिया त्यांच्या नेतृत्वात पार पडली.देशात पहिल्यांदाच पार पडलेल्या निवडणुकीची प्रक्रिया चार महिने चालली. २५ ऑक्टोबर १९५१ मध्ये निवडणूक सुरु झाली.त्यानंतर फेब्रुवारी १९५२ ला देशातील पहिल्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. तेव्हा लोकसभेच्या ४९९ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये जवळपास १७ कोटी नागरिकांनी सहभाग घेतला होता. या निवडणुकीत ४५.७ टक्के मतदान झालं.

भारतामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली गेली होती. याचा निकाल काय असणार याची उत्सुकता सगळ्यांचं होती. देशाच्या पहिल्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने आघाडी मारली. ४५ टक्के मतं काँग्रेसच्या पारड्यात पडली होती. तर निवडणूक आलेल्या उमेदवारांमध्ये ७५ टक्के उमेदवार हे काँग्रेसचे होते. या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत ३६४ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.तर कम्युनिस्ट पक्षाने १६ जागा जिंकल्या. त्यातल्या ८ जागा मद्रासमधून निवडून आल्या होत्या. भारतीय जनसंघाने ४९ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील केवळ 3 जागाच त्यांना जिंकता आल्या होत्या.

हे ही वाचा:

महाविकास आघडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग, हिंदू बंधू-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? एकनाथ शिंदेनी साधला ठाकरेंवर निशाणा

बृहन्मुंबई महापालिका इक्बाल सिंह चहल यांच्यासह आयुक्त, उपायुक्तांना पदावरून हटवले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss