Tuesday, April 16, 2024

Latest Posts

तुमच्याकडे स्वतःचा पक्ष कुठे आहे ? – उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय रायगड दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पोलादपूरमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे सध्या वेगळ्या वळणावर आहे. मतदारराजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे. आता झोपी गेलास तर पुढे दिवस सुद्धा वैऱ्याचे येतील. भापज हिंदुत्वव फोडणारा पक्ष आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या हिंदुत्ववावरून राजकारण केले जात आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे ही सरकारची भूमिका आहे. पण सध्या राज्यात चालू असलेल्या राजकारणावरून दिसून येत कि भाजप हिंदुत्व फोडणारा पक्ष आहे. मी जनसंवाद करत नाही मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधत आहे. तुम्ही मला आपल्या कुटुंबातला सदस्य मानता, हे माझे भाग्य आहे. ‘सरकार आपल्या दारी’ आणि लोक सांगतायत ‘जा तुझ्या घरी, आम्ही अन्यायावर वार करणारे ‘वारकरी’. भ्रष्टाचार करा, भाजपात या, ही मोदी गॅरंटी आहे. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना स्वतःकडे घेते आणि पावन करते. महाराष्ट्रातील सरकारमध्ये असणारे मंत्री दिल्लीत आपल्या राज्याच्या दुरावस्थेबद्दल का बोलत नाहीत? ते खोके गिळून गप्प बसलेत. मोदीजी म्हणतात गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. पण ज्या ज्या वेळी देशावर संकट आले , त्या त्या वेळी महाराष्ट्र धावून गेलाय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. तुमच्याकडे स्वतःचा पक्ष कुठे आहे ? आहे तो सगळा ‘चोरबाजार’ आहे. आम्ही ज्ञानोबा, तुकोबा, छत्रपती शिवाजी महाराज, भवानी मातेची पालखी वाहू; पण भाजपची पालखी वाहणारे नाही. आम्ही शिवबांचे, भारतमातेचे भक्त आहोत, कुण्या एका व्यक्तीचे भक्त नाही.देशभक्त नेहमी जिंकतो. तुम्ही जनता माझ्यासोबत असताना माझ्यासमोर कुणीही उभा राहू दे. मला पर्वा नाही, तुमचे मित्र म्हणजे देश नव्हे, ही जनता म्हणजे देश आहे. जनतेसाठी काम करा, ‘मतदारराजा जागा रहा, रात्र वैऱ्याची आहे.’ आता झोपी गेलास, तर पुढे दिवससुद्धा वैऱ्याचे येतील , असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमच्या वडिलांचा फोटो लावून मत मागा माझ्या वडिलांचा फोटो लावून मत मागू नका, असे उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी सभेत बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनासुद्धा टोला लगावला आहे. स्वप्नातील पालकमंत्री, नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळत नाही. झेंडे सोडून नॅपकिन फिरवतात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भरात गोगावले यांच्यावर टीका केली आहे.

हे ही वाचा:

Sachin Tendulkar चा व्हिडिओ वायरल, टी शर्ट पाहून गाडी थांबवत घेतली चाहत्यांची भेट

डोंबिवलीमध्ये भररस्त्यात रोड रोमियोकडून महिलेची छेडछाड, रोड रोमियोवर गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss