Tuesday, April 16, 2024

Latest Posts

मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसे नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री,उपमुख्यमत्र्यांची भेट

मागील काही दिवसांपासून मनसे भाजपच्या युतीबद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मागील काही दिवसांपासून मनसे भाजपच्या युतीबद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. मनसेच्या काही नेत्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेतली तर सोमवारी उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर या बैठकी होत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून तीन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची ८ ते १० दिवसांत पुन्हा एकदा भेट होण्याची शक्यता आहे. मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. मनसेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर, नितिन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. लवकरच तीन वरिष्ठ नेत्यांची बैठक देखील होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यांच्या वाढत्या भेटीमुळे सगळीकडे अनेक चर्चाना उधाण आले आहे.

काही दिवसांआधी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले होते. एकाच व्यासपीठावर आल्याने मनसे भाजप युती होणार का अश्या चर्चा रंगल्या आहेत. भाजपच्या नेत्यांनी अनेकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यातच आता मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगांवकर आणि नितिन सरदेसाई यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतली. त्यामुळे मनसे भाजप युती होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे नेते संदिप देशपांडे बैठक झाल्याचे सांगितले होते.

हे ही वाचा: 

‘माझ्या आयुष्यात असा एकही क्षण …लेकाची अशोक सराफासाठी खास पोस्ट | Ashok Saraf | Aniket Saraf

पुण्यातील गुंडाना दम देऊनही निलेश घायवळचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss