Tuesday, April 23, 2024

Latest Posts

कधीही बरा न होणारा ‘द्वेष आणि मुजोरी’ चा रोग तुम्हाला जडलाय- UDDHAV THACKERAY

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मानसिक स्थिती बिघडलेली असून महाराष्ट्र राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत. निर्ढावलेला निर्दय मनाचा हा गृहमंत्री आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि तुम्ही त्यांची तुलना श्वानाशी करता? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप महाराष्ट्र यांच्या सोशल मिडियावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावण्यात आला. त्यावर आता ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे.

महाराष्ट्राची वाट लावल्यावरही तुमची मुजोरी आणि रेटून खोटं बोलणं कमी होत नाही. तुम्ही एका राष्ट्रीय पक्षाचं अधिकृत हॅंडल आहात ह्याचं भान ठेवा आणि ४० पैसे प्रति ट्विट करणाऱ्या ‘फेक ट्रोलिंग अकाऊंट’ सारखं लिहिणं बंद करा. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण आणि सामाजिक स्वास्थ्य तुम्ही बरबाद केलंच आहात, आता समाज माध्यमांवरही प्रदुषण वाढवत आहात. (तुम्ही बरे व्हाल अशी अपेक्षाच नाही, कारण कधीही बरा न होणारा ‘द्वेष आणि मुजोरी’ चा रोग तुम्हाला जडलाय.

काय होते भाजप महाराष्ट्रचे ट्वीट? 

उबाठा, मा. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येक वेळी तुमचे रुसवे फुगवे दूर करीत तुम्हाला सोबत घेतले. पण तुम्ही कायम त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत राहिलात. हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे. ‘तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते. ते सांगावेत का? ‘मोदी की गॅरंटी‘ ही जनतेच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही सत्तेत असताना ‘वसुली की गॅरंटी‘ होती, हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं. गँगवॅार सरकारमध्ये नाही तर तुमच्या उबाठा गटात सुरू आहे. उबाठा गटातील दोन लोकांनी गोळ्या घातल्या आणि गँगवॅार सुरू केलं. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडली आहे. अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात. जनतेला सोडा साधं तुमच्या लोकांनाही भेटत नव्हता. आपल्याच पक्षातील नेत्यांना, आमदारांना मातोश्रीवर ताटकळत ठेवत होता. या सर्व घटना उभ्या महाराष्ट्रानं पहिल्या आहेत. त्यामुळे शेळपट लोकांनी फुकाच्या गप्पा मारू नयेत. उबाठा बरे व्हा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा!

हे ही वाचा: 

एकनाथ शिंदे हे फेकूचंद,फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार? हे गुंडांचे सरदार; संजय राऊतांची शिंदेंवर टीका

मुंबईच्या तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक, असे करा प्रवासाचे नियोजन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss