Friday, April 19, 2024

Latest Posts

तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून…उबाठा बरे व्हा, BJP चे ट्वीट व्हायरल

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत असतांना आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हे सरकार तात्काळ बरखास्त करावे तसेच राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. यासोबतच, उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

देवेंद्र फडणवीस यांची मानसिक स्थिती बिघडलेली असून महाराष्ट्र राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत. निर्ढावलेला निर्दय मनाचा हा गृहमंत्री आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि तुम्ही त्यांची तुलना श्वानाशी करता? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप महाराष्ट्र यांच्या सोशल मिडियावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावण्यात आला आहे.

काय आहे भाजप महाराष्ट्रचे ट्वीट? 

उबाठा, मा. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येक वेळी तुमचे रुसवे फुगवे दूर करीत तुम्हाला सोबत घेतले. पण तुम्ही कायम त्यांच्या पाठीत खंजीर खुपसत राहिलात. हा सर्व प्रकार जनतेला माहीत आहे. ‘तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्या मनोरुग्ण स्वभावाचे किस्से तुमच्याच पक्षातील आमदार कसे चघळत होते. ते सांगावेत का? ‘मोदी की गॅरंटी‘ ही जनतेच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही सत्तेत असताना ‘वसुली की गॅरंटी‘ होती, हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं. गँगवॅार सरकारमध्ये नाही तर तुमच्या उबाठा गटात सुरू आहे. उबाठा गटातील दोन लोकांनी गोळ्या घातल्या आणि गँगवॅार सुरू केलं. त्यामुळे तुमची मानसिक स्थिती बिघडली आहे. अडीच वर्षे सरकार असताना तुम्ही गळ्यात सोनिया सेनेचा पट्टा बांधून शेपट्या हलवत होतात. जनतेला सोडा साधं तुमच्या लोकांनाही भेटत नव्हता. आपल्याच पक्षातील नेत्यांना, आमदारांना मातोश्रीवर ताटकळत ठेवत होता. या सर्व घटना उभ्या महाराष्ट्रानं पहिल्या आहेत. त्यामुळे शेळपट लोकांनी फुकाच्या गप्पा मारू नयेत. उबाठा बरे व्हा, आमच्या तुम्हाला शुभेच्छा!

हे ही वाचा: 

पुण्यातील ‘निर्भय बनो’ कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ, निखिल वागळेंवर हल्ला

चाळीसगावाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss